नाशिक : सामान्य नागरिकांच्या दुचाकी चोरणाºया चोरट्यांनी आता पोलीसदादांनाही आपला हिसका दाखविण्यास सुरुवात केली असून, याचा पहिला फटका सातपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाºयास बसला आहे़ याबरोबर शहरातील गंगापूर व नाशिकरोड परिसरातून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याच्या घटना घडलेल्या आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदकिशोर पंढरीनाथ कापसे (३७) हे सातपूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आहे़ त्यांची हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १५, बीए ३२५) संशयित जितेंद्र काशीनाथ सूर्यवंशी याने १९ आॅगस्ट रोजी जिंजर हॉटेलजवळून चोरून नेली़ तब्बल सहा दिवस होऊनही दुचाकीचा शोध न लागल्याने कापसे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ त्यानुसार सातपूर पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दखल करण्यात आला आहे़ दुचाकीचोरीची दुसरी घटना गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील माणिकनगरमध्ये घडली़ माणिकनगरच्या श्रमिक हौसिंग सोसायटीतील रहिवासी अक्षय कातोरे यांची ३० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची बजाज पल्सर दुचाकी (एमएच १५, डीपी ८३००) २४ ते २५ आॅगस्ट २०१७ या कालावधीत चोरट्यांनी घराच्या पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी कातोरे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दुचाकीचोरीची तिसरी घटना नाशिकरोडच्या शिवाजी पुतळ्याजवळ २६ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़ जुनी चेहेडीशिव परिसरातील खर्जुल मळ्यातील रहिवासी रतन खर्जुल यांची २५ हजार रुपये किमतीची काळ्या पिवळ्या रंगाची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (एमएच १५, बीजी ९३५७) चोरट्यांनी जनता हार्डवेअर दुकानासमोर चोरून नेली़ याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दुचाकी चोरट्याचा पोलिसाला हिसका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:35 AM