-------------------------
पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
सिन्नर : ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा सिन्नर नगर परिषदेच्या संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. याप्रकरणी नायब तहसीलदार सागर मुंदडा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर एन. एम. परदेशी, व्ही. जी. हाडके, ए. जी. जाधव, आर. आर. मुंगसे, बी. डी. नवाल, एस. पी. शिंदे, अमित लुले, आर. व्ही. देशमुख, एम. डी. आहेर, आकाश शिंदे आदींसह कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
---------------------
ठाणगावला जनसेवा गोशाळेच्या कामाचा शुभारंभ
सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव येथे गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर मंगळवारी जनसेवा गोशाळेचे भूमिपूजन करण्यात आले. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते गोशाळेचे कामाचा शुभारंभ करण्यात आला. जनसेवा सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष मुकुंद काकड यांच्या संकल्पनेतील गोशाळा प्रत्यक्षात आणण्यासाठी संस्थेच्या सदस्यांनी कंबर कसली. त्यात गावातील माधव शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांनी गोशाळेसाठी मारुतीचा मोढा परिसरात २१ गुंठे जागा उपलब्ध करून दिली असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रामदास भोर यांनी सांगितले.
------------------
कडाळे यांचा जाणता प्रतिष्ठानकडून गौरव
सिन्नर : जाणता प्रतिष्ठान सह्याद्री देवराई अभियानांंतर्गत दापूर येथील अजय कडाळे यांनी परिसरात वृक्षारोपण केल्याबद्दल तालुका संघटक सुभाष सांगळे, संदीप आव्हाड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे, बाळासाहेब आव्हाड, अर्जुन आव्हाड, सुनील आव्हाड, संदीप बोडके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.