___
पंचवटी : म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करून गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या उमेश अण्णा धोत्रे या गुन्हेगाराला नवनाथनगर परिसरातून तर शहरातून विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक करत त्यांच्याकडून पल्सर तसेच एक्टिवा जप्त केल्या आहेत.
उमेश धोत्रे नामक संशय झाले दोन वर्षांपूर्वी परिसरात जबरी चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती या घटनेनंतर धोत्रे हा मुंबई येथे पसार झाला होता २ दिवसांपूर्वी धोत्रे नाशिकला नवनाथनगरला त्याच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना मिळताच
त्यांनी गुन्हासोबत माहिती दिली, त्यानुसार अशोक साखरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सत्यवान पवार, विलास चारोस्कर, दिलीप बोंबले, कुणाल पचलोरे, कल्पेश जाधव, राजू राठोड, घनश्याम महाले, सागर कुलकर्णी आदींनी परिसरात सापळा रचून धोत्रे याला ताब्यात घेत म्हसरूळ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
दुचाकी चोरीप्रकरणी पोलिसांनी दिंडोरी तालुक्यातून किरण गुलाब लांडे, सिडको येथील राजेंद्र धरणे, व एक विधिसंघर्षित बालक अशांना ताब्यात घेतले आहे. लांडे याने तीन वर्षापूर्वी (एमएच १५ इटी ००९४) दुचाकी चोरली होती व ती दिंडोरीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार लांडे याला ताब्यात घेतले तर धरणे हा वापरत असलेला ॲक्टिवा दुचाकी क्रमांक (एएच १२ एससी ७०२४) रामकुंडावर संशयास्पद घेऊन फिरत असताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर दुचाकी पुणे येथून चोरी गेली होती,
असे निष्पन्न झाले तर (एमएच १२ एफटी ७५२८) दुचाकी विधी संघर्षित बालकाने राहत असलेल्या इमारतीतून चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून निष्पन्न झाले.