नाशिकरोड : पळसे येथे शहर वाहतुकीच्या बसवर भरधाव वेगात जाणारा दुचाकीचालक येऊन धडकल्याने एकजण ठार झाला असून, दुसरा जखमी झाला आहे.बसचालक दिलीप गोविंद अहिरे हे आज पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास पंचवटी-पळसे ही बस (एमएच १५ एके ८०३०) घेऊन पळसे येथे गेले. तेथुन पुढे बस निघताच समोरून दुचाकीवर दोघेजण भरधाव वेगात नाशिकरोडला येत होते. त्यामुळे बसचालक आहिरे यांनी बस थांबविली. मात्र समोरून भरधाव वेगात येणारी दुचाकी बसवर आदळल्याने केजे मेहता महाविद्यालयात १२ वीला शिकणारा सौरभ भाऊसाहेब नरोडे, रा. शिंदेगाव हा दुचाकी चालविणारा विद्यार्थी जागीच ठार झाला. तर पाठीमागे बसलेला विद्यार्थी विशाल दिलीप पिंपळे, रा. पळसे हा गंभीर जखमी झाला. बस थांबविल्याने पाठीमागून टेम्पो (एमएच १५ डीके ३७४८) बसवर आदळल्याने टेम्पोचे नुकसान झाले.
बसवर धडकल्याने दुचाकीस्वार ठार
By admin | Published: January 14, 2015 12:01 AM