सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे गावाजवळ फॉर्च्युनर कार उलटून झालेल्या अपघातात मालाड (मुंबई) येथील दोन महिला साईभक्त जागीच ठार झाल्या. तर अन्य तीनजण जखमी झाले आहेत. पाथरे शिवारात वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने गुरुवारी सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास कार उलटून अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तिघा जखमींवर शिर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मालाड मुंबई येथील भाविक फॉर्च्युनर कार (क्र. एम. एच. ४८ ए. सी. ६९९७) ने साईबाबांच्या दर्शनासाठी गुरुवारी पहाटे शिर्डीकडे निघाले होते. जखमींना शिर्डी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात ठार झालेले व जखमी असलेले सर्व भाविक मालाड, मुंबई येथील आहेत. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. चौकट- धोकादायक वळण सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पाथरे गावाजवळ वीज उपकेंद्रावर तीव्र वळण आहे. या वळणावर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. याशिवाय महामार्गावर रस्त्याच्या दुर्तफा बाभळी वाढल्याने वळणावर समोरुन येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघात होत असतात. अपघात वाढत असल्याने या परिसरातील काटेरी बाभळी स्वखर्चाने काढणार असल्याचे पाथरे बुद्रूकचे माजी सरपंच मच्छिंद्र चिने यांनी सांगितले.
सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील अपघातात दोन महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 4:00 PM
सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे गावाजवळ फॉर्च्युनर कार उलटून झालेल्या अपघातात मालाड (मुंबई) येथील दोन महिला साईभक्त जागीच ठार झाल्या. तर अन्य तीनजण जखमी झाले आहेत.
ठळक मुद्देवावीच्या पुढे गेल्यानंतर पाथरे शिवारात खंडोबा मंदिराजवळ वीज वितरण कार्यालयासमोर असलेल्या वळणावर चालकाचा ताबा सुटून कार रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारीत गेली. त्यानंतर कार उलटली. या अपघातात परीता मोदी व भावना वडानी या दोन महिला ठार झाल्या. तर केवीन मोदी,