शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

स्त्री रुग्णालयावरून भाजपा नगरसेवकांत पडले दोन गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 1:00 AM

शासन अनुदानातून उभारण्यात येणाºया शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयावरून भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांच्यात थेट संघर्ष उभा राहिला असतानाच या रुग्णालयावरून महापालिकेतील सत्ताधारी भाजपातही दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गिते-फरांदे समर्थक नगरसेवकांमध्येच जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक : शासन अनुदानातून उभारण्यात येणाºया शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयावरून भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांच्यात थेट संघर्ष उभा राहिला असतानाच या रुग्णालयावरून महापालिकेतील सत्ताधारी भाजपातही दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गिते-फरांदे समर्थक नगरसेवकांमध्येच जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शासन अनुदानातून भाभानगर येथे शंभर खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्यास महासभेने मान्यता दिलेली आहे. सदर रुग्णालयावरून आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली असतानाच दोघांच्या समर्थक नगरसेवकांकडूनही आता थेट समर्थन केले जात आहे. सर्वप्रथम आयुक्तांनी भाभानगरच्या जागेचा प्रस्ताव महासभेवर मंजुरीसाठी ठेवला होता, त्यावेळी अर्चना थोरात यांनी सदरचा प्रस्ताव तहकूब ठेवण्याची मागणी करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उपमहापौर प्रथमेश गिते यांनी आयुक्तांच्या प्रस्तावाला उपसूचना देऊन टाकळीरोड येथील पर्यायी जागेची सूचना केली होती. परंतु या प्रस्तावाला विरोध करत फरांदे समर्थक मानल्या जाणाºया सुप्रिया खोडे यांनी आपला प्रभाग नसताना भाभानगरची जागाच स्त्री रुग्णालयासाठी देण्याची मागणी केली. या साºया घटना-घडामोडींनंतर मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या आदेशान्वये भाभानगरच्या जागेचा मूळ आयुक्तांचा प्रस्ताव मान्य करून तसा ठराव पाठविण्यात आला. त्यामुळे गिते समर्थक खवळले असून, भाभानगरला रुग्णालय होऊ न देण्याचा निर्धार केला आहे. आता गिते-फरांदे यांचे समर्थक रुग्णालयासाठी पुढे येऊ लागले आहेत. भाजपाचे सिडकोतील नगरसेवक व गिते समर्थक मानले जाणारे मुकेश शहाणे यांनी आयुक्तांना पत्र देऊन सदर शंभर खाटांचे रुग्णालय सिडकोतील पेलिकन पार्कच्या जागेत उभारण्याची मागणी केली आहे. या रुग्णालयावरून भाजपा नगरसेवकांतही दोन गट पडत चालल्याचे दिसून येत आहे.