शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये  दोघा तरुणांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 1:26 AM

म्हसरूळ राजवाड्यात राहणाऱ्या एका २४ वर्षीय युवकाने राहत्या घराच्या आड्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.१) उघडकीस आली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पंचवटी : म्हसरूळ राजवाड्यात राहणाऱ्या एका २४ वर्षीय युवकाने राहत्या घराच्या आड्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.१) उघडकीस आली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सनी गौतम पगारे (२४) असे आत्महत्या करणाºया युवकाचे नाव असून, तो म्हसरूळच्या राजवाड्यात कुटुंबीयांसमवेत राहत होता. सनी पगारे गुरुवारी (दि.३१) रात्री घराच्या वरच्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता त्याची आई त्याला उठविण्यास गेली असता सनीने आड्याला साडीने गळफास घेतल्याचे आढळून आले. या घटनेची म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस जमादार वसंत जाधव पुढील तपास करीत आहेत.दरम्यान दुसºया एका घटनेत अंबड औद्योगिक वसाहतीतील जाधव संकुल भागातील अभिमन कडू सावकार (३५) तरुणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.अंबड परिसरातील जाधव संकुल भागात म्हाडाच्या घरात राहणाºया अभिमन कडू सावकार असे आत्महत्या करणाºया युवकाचे नाव आहे. अभिमन सावकार यांनी शुक्रवारी (दि.१) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच त्याचा भाऊ हेमंत सावकार यांनी त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अभिमनच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान, शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घरफोडीतून दोन लाखांचा ऐवज चोरीशहरातील घरफोड्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अंबड व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा घरफोड्यांच्या घटना घडल्या आहेत. या घरफोड्यांच्या दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. सिडकोतील औदुंबर बसस्टॉपजवळील माऊल प्रभात कॉलनीतील रहिवासी निर्मला बाबूराव गायकवाड (६०) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरफोडी करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश करणाºया चोरट्यांनी २९ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ आणि ३० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार भड या प्रकरणीचा तपास करीत आहेत.दुचाकी चोरीचे सत्र सुरूचशहरासह उपनगरांमध्ये दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून इंदिरानगर, पंचवटी आणि म्हसरूळ भागात पुन्हा वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन दुचाकींची चोरी झाल्याचे गुन्हे समोर आले आहेत. अज्ञात चोरट्यांनी इंदिरानगर, पंचवटी आणि म्हसरूळसारख्या भागातील वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन दुचाकींची चोरी केली आहे. यात पाथर्डी फाटा, खंडेरावनगर परिसरातील सागर सुनील केंद्रे (२७) पाथर्डी यांची दुचाकी क्रमांक एमएच १५, डीपी ००२६ वासननगरमधील गोकुळ हाइट्स येथून चोरीला गेली. तर सातपूरच्या श्रमिकनगर भागातील प्रवीण मनोहर चरडे (३३) यांची दुचाकीही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी