इगतपुरी : रंगपंचमी खेळुुन झाल्यावर रेल्वे तलावावर अंघोळ करण्यासाठी आलेल्या घोटी येथील दोन तरूणांचा बुडुन मृत्यु झाला. सोमवार दि. २५ रोजी रंगपंचमी खेळुन झाल्यावर सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घोटी येथील मयुर भोले (२१), तौसीफ मणियार (२३) व जलीम अंसारी (२३) सर्व राहाणार नवनाथ नगर, घोटी हे तीन तरूण आंघोळ करण्यासाठी इगतपुरी शहरातील रेल्वे तलावावर आले होते. यात मयुर अर्जुन भोले व तौसिफ मेहमुद मणियार हे दोघे तळ्यात अंघोळ करत असतांना तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघे बुडाले. तर जलीम अंसारी वाचला आहे. या घटनेची माहिती समजताच इगतपुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नांदगाव सदो येथील पानबुडयांच्या मदतीने बुडालेल्या तरु णांचा शोध घेण्याचे काम सुरु केले. रात्री दहा वाजेच्या सुमारास मयुर भोले याचा मृतदेह नांदगावसदो येथील बचाव पथकाने तळ्यातुन काढला. तर तौसीफ मणियारचा मृतदेह रात्री सव्वा अकरा वाजेच्या दरम्यान मिळाला. या बाबतची माहिती घोटी इगतपुरी शहरात पसरताच नागरिकांनी रेल्वे तलावावर गर्दी केली होती. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन सहायक पोलीस निरीक्षक महेश मांडवे यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद गोसावी, गणेश वराडे, सचिन देसले आदी करीत आहे.
इगतपुरीत रंगपंचमीला दोन तरूणांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 2:16 PM