शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

वाहनाच्या धडकेत जुन्या नाशकातील दोघे युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 1:12 AM

ओझरवरून काम आटोपून मुंबई-आग्रा महामार्गावरून जुने नाशिककडे परतत असताना आडगावजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील जुन्या नाशकातील दोघे युवक जागीच ठार झाले.

नाशिक : ओझरवरून काम आटोपून मुंबई-आग्रा महामार्गावरून जुने नाशिककडे परतत असताना आडगावजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील जुन्या नाशकातील दोघे युवक जागीच ठार झाले. नाईकवाडीपुरा येथील सय्यद कुटुंबीयांनी एकुलता एक मुलगा अझहरला या अपघातात गमावले, तर काजीगढीवरील बागवान कुटुंबातील हाजी मलंग हा घरातील कर्ता पुरुषच हरपला. या अपघाताची बातमी रात्री जुन्या नाशकात येताच संपूर्ण जुने नाशिक भागात शोककळा पसरली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, ओझरकडून शुक्रवारी (दि.२०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास नाशिककडे अ‍ॅक्टिवा दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार हाजी मलंग बागवान (वय ४०, रा. काजीगढी), अझहर इलियास सय्यद (वय २७, रा. नाईकवाडीपुरा) या दोघांचा मृत्यू झाला. पाठीमागून भरधाव जाणाऱ्या वाहनाने अझहर व मलंग या दोघांना चिरडले. अझहर चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर मलंग यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जुन्या नाशकात हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच अझहरने अ‍ॅक्टिवा दुचाकी खरेदी केली होती. अद्यापपर्यंत दुचाकीला क्रमांकदेखील आरटीओकडून मिळालेला नव्हता. तत्पूर्वीच काळाने या दोघांवर घाला घातला.मलंग यांनी डोक्यावर हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवित होते व अझहर हा त्यांच्यासोबत पाठीमागे बसलेला होता, असे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणी मलंग यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. बागवान यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक लहान मुलगी, मुलगा, असा परिवार आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक संजय बिडगर हे करीत आहेत.अझरहरचा नुकताच झाला होता साखरपुडासय्यद कुटुंबाचा अझहर हा एकमेव आधार होता. काही महिन्यांपूर्वीच त्याच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले. तसेच दोन महिन्यांपूर्वीच अझहरचा साखरपुडा झाला होता. या कुटुंबाचा तो एकुलता एक कर्ता मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, दोन विवाहित बहिणी, असा परिवार आहे. अझहरच्या अपघाती मृत्यूने या कुटुंबाने आधार गमावला आहे. त्याच्या पार्थिवाचे जहांगीर कब्रस्तानात शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू