नाशिक : इंदिरानगर भागातील जगन्नाथ चौकातून शरयू नगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर परिसरातील व्यावसायिक व किरकोळ विक्रेत्यांकडून कचरा फेकण्याचे प्रकार सुरू आहेत. यात शिळे अन्न व भाजीपाल्यासारख्या नाशवंत पदार्थांचा समावेश अशल्याने या भागात दुर्गंधी पसरली असून परिसरातील नागरिकांकडून कचरा हटविण्याची मागणी होत आहे.
--
विद्यार्थी वाहतूकदारांवर आर्थिक
नाशिक : कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी वाहतूकही बंद आहे. जानेवारी व फेब्रुवारमध्ये शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूलबस व रीक्षाचालकांना रोजगार सुरू होण्याची आशा निर्माण झाली होती. परंतु. पुन्हा कोरोनाचे संकट वाढल्याने शाळा बंद झाल्या असून विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे रिक्षा व स्कूल बस चालक आर्थिक संकटात सापडले आहेत.
--
शरयुनगर पांडवनगरी रस्त्याची दुरवस्था
नाशिक : इंदिरानगर भागात शरयुनगर ते पांडवनगरी रस्त्यावर गॅस लाईनसाठी खोदकाम करण्यात आल्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेकडे स्थानिक लोकप्रतिनधी व मनपाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे
--
सिग्नल बंद असल्याने वाहतुकीस अडसर
नाशिक : त्र्यंबकरोडवरील महापालिकेच्या जलतरण तलावाजवळीस सिग्नल बंद असल्याने वाहतुकीस अडसर निर्माण होत आहे. या सिग्नलवरून टिळकवाडीकडे येणारी वाहने व सातपूरकडून नाशिकच्या दिशेने येणारी वाहने समोरासमोर येऊन अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा सिग्नल तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
--
नासर्डी नदीला प्रदुषणाचा विळखा
नाशिक : नासर्डी नदीत प्लास्टीकसह विविध प्रकारचा कचारा फेकला जात असल्याने या नदीला प्रदुषणाने विळखा घातला आहे. त्याचप्रकारे ठिकठिकाणी रहिवाशी वसाहतींमधून निघणारे पाणी विना प्रक्रिया नदीपात्रात सामाविष्ट होत असल्यानेही नदीचे जलप्रदुषणही मोठ्या प्रमाणात होत असून नासार्डी नदी परिसरात दुर्गंधी पसरत आहे.