नाशिक : द्वारका सर्कलवर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएएचआय) व महापालिका या तिघांनी संयुक्तपणे यू-टर्नचा पर्याय शोधला आहे़ सोमवार (दि़९) व मंगळवार (दि़१०) असे दोन दिवस सकाळी ११ ते ४ या वेळेत प्रायोगिक तत्त्वावर या यू-टर्नचा वापर केला जाणार असल्याची अधिसूचना पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढली आहे़पुणे, मुंबई, औरंगाबाद, धुळे, शिर्डी तसेच ग्रामीण भागात ये-जा करणाºया वाहनांमुळे द्वारका सर्कलवर नियमित कोंडी होते़ त्यातच द्वारका सर्कल व त्यास जोडणाºया रस्त्यावर असलेल्या अतिक्रमण, अनधिकृत फेरीवाले यामुळे या कोंडीत आणखीच भर पडते़ या कोंडीवरील उपाययोजनेबाबत शहर पोलीस व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या वरिष्ठ अधिकाºयांमध्ये झालेल्या चर्चेनुसार प्रायोगित तत्त्वावर सोमवार व मंगळवार असे दोन दिवस सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीत द्वारका सर्कल या ठिकाणी पुणे, मुंबई, धुळे व नाशिककडे ये-जा करणाºया वाहनांनी द्वारका सर्कल येथे एकमेकांना क्रॉस न करता आपल्या डाव्या बाजूंना वळण घेऊन वडाळा नाका व ट्रॅक्टर हाउस येथे यू-टर्न वळण घेऊन पुढे मार्गस्थ होणेबाबत नियोजन केले आहे़ त्यानुसार वाहतुकीत बदल करण्यात आला आहे़
‘द्वारका’ला यू-टर्नचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 1:45 AM