श्याम बागुल । नाशिक : महाराष्टÑ सदन बांधकाम प्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा दोष नसल्याचे सांगत भुजबळ ‘क्लीन चिट’ असल्याचे पत्र देणाºया शिवसेनेला टाळून भुजबळ समर्थकांनी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने शिवसेनेत अस्वस्थता व तितकाच संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच भुजबळ समर्थकांनी ‘अन्याय पे चर्चा’ करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मागितलेली वेळ देण्यास टाळटाळ केली जात असल्याची चर्चा होऊ लागली आहे.महाराष्टÑ सदन बांधकाम घोटाळा व बेनामी संपत्ती प्रकरणावरून माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सध्या तुरुंगात असून, त्यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यातील कलम ४५ रद्द ठरविल्यामुळे भुजबळ यांना जामीन मिळावा म्हणून केलेला अर्ज विशेष न्यायालयाने मध्यंतरी रद्द केला. भुजबळ यांच्या विरोधात सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याची तक्रार भुजबळ समर्थक करीत असल्याने त्यांनी ‘अन्याय पे चर्चा’ हा उपक्रम हाती घेत एकप्रकारे सरकार व न्यायालय दोघांनाही आरोपीच्या पिंजºयात उभे केले आहे. दोन दिवसांपूर्वीच भुजबळ समर्थकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली. ठाकरे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून ऐनवेळी भूमिका जाहीर करण्याचे आश्वासन देतानाच भुजबळ समर्थकांना खडे बोल सुनावले हा भाग अलाहिदा. परंतु ज्या भुजबळांवर नाशिक महापालिका व विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रछन्न आरोप करून राळ उठवून दिली होती त्या राज ठाकरे यांच्या दरबारात भुजबळ यांच्यासाठी समर्थकांनी हजेरी लावण्याची बाब शिवसेनेला खटकली आहे. मुळात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाराष्टÑ सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी भाजपाने छगन भुजबळ यांना घेरण्यास सुरुवात केल्यानंतर सर्वात अगोदर शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाराष्टÑ सदन बांधकामाचा विषय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला असून, त्यात एकट्या भुजबळ यांचा दोष नसल्याचे सांगत भुजबळ यांना क्लीन चिट दिली होती व भुजबळ यांची चौकशी करायची असेल तर संपूर्ण उपसमितीचीही चौकशी करावी लागेल. (पान ७ वर)त्यामुळे भुजबळ यांना न्याय द्यावा, अशी विनंती पत्रात केली होती.भेटही खटकलीशिवसेनेचे भाजपाचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या विषयी असलेला पराकोटीचा राग लक्षात घेऊन भुजबळ समर्थकांनी एकनाथ खडसे यांच्या दरबारात ‘अन्याय पे चर्चा’ केल्याची बाबही सेनेला सर्वाधिक खटकली आहे. खडसे यांना भुजबळ समर्थकांनी दिलेले अधिकचे महत्त्व सेनेला पटलेले नाही. खडसे यांनीच सेना व भाजपाची युती तुटल्याचे जाहीर केले असल्यामुळे सेनेचे भाजपाइतकेच खडसेंविषयीही शत्रुत्व तयार झाले. अशा स्थितीत भुजबळ समर्थकांनी त्यांची घेतलेली भेट उद्धव यांच्या नाराजीचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
भुजबळ समर्थकांच्या ‘राज’ भेटीने उद्धव नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:17 AM
नाशिक : महाराष्टÑ सदन बांधकाम प्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा दोष नसल्याचे सांगत भुजबळ ‘क्लीन चिट’ असल्याचे पत्र देणाºया शिवसेनेला टाळून भुजबळ समर्थकांनी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने शिवसेनेत अस्वस्थता व तितकाच संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच भुजबळ समर्थकांनी ‘अन्याय पे चर्चा’ करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मागितलेली वेळ देण्यास टाळटाळ केली जात असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
ठळक मुद्देवेळ देण्यास टाळाटाळ खडसेंच्या भेटीनेही भर