नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) पहिल्या टप्प्यात १७ विविध पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. या मान्यतेनंतर विद्यापीठाला आणखी १५ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची मान्यता मिळविण्यात यश आल्याची माहिती कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन यांनी शुक्रवारी (दि. ५) दिली.देशभरातील विविध विद्यापीठातील दुरस्थ शिक्षण पद्धतीच्या अभ्यासक्रम प्रस्तांवाची विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) छाननी झाल्यानंतर ३ आॅगस्ट २०१८ रोजी प्रथम बैठकीदरम्यान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या १७ शिक्षणक्रमांना मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर मुक्त विद्यापीठाने उर्वरित अभ्यासक्रमांसाठी पाठपुरावा केल्यानंतर त्यावर सकारात्मक निर्णय घेत २७ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत यूजीसीने आणखी १५ अभ्यासक्रमांना मान्यता दिली असून, अशाप्रकारे मुक्त विद्यापीठाला ३२ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना यूजीसीची मान्यता मिळाली आहे.
‘मुक्त’च्या आणखी १५ अभ्यासक्रमांना यूजीसीची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:41 AM