पिंपळगाव बसवंत : येथून जवळच असलेल्या उंबरखेड शिवारात संतोष मोगल यांच्या उसाच्या शेतात मंगळवारी (दि. ४) सायं. ८ वाजता बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.उंबरखेड शिवारात ऊस व बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने परिसरात बिबट्यांचा सर्वाधिक वावर असून, पाळीव जनावरेदेखील काही दिवसांपूर्वी फस्त केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी संतोष मोगल यांच्या उसाच्या शेतात काम करणाºया नागरिकांना बिबट्या दिसल्याने त्यांनी याबाबत वनविभागास कळवून परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली. वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आल्याने मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान संतोष मोगल यांच्या उसाच्या शेतात बिबट्याला पिंजºयात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
उंबरखेडला बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 2:12 AM
पिंपळगाव बसवंत : येथून जवळच असलेल्या उंबरखेड शिवारात संतोष मोगल यांच्या उसाच्या शेतात मंगळवारी (दि. ४) सायं. ८ वाजता बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.
ठळक मुद्दे संतोष मोगल यांच्या उसाच्या शेतात बिबट्याला पिंजºयात जेरबंद करण्यात वनविभागाला यश