नाशिक : इक्वल राइट््स आॅफ दी ब्लाइन्ड आणि युगांतर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंध बांधवांना छत्रीचे वाटप करण्यात आले. नाशिक-पुणे रोडवरील डॉ. आंबेडकरनगर येथील हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सुषमा पगारे, इक्वल राइट््सच्या अध्यक्ष अंजना सहजराव, सचिव रमेश बोराळे, हॉटेल एक्स्प्रेस इनचे व्यवस्थापक फिलीप सिक्वेरा, प्रशिक्षण व्यवस्थापक अजय छाब्रा, युगांतरचे संस्थापक रवि पगारे, संदीप भंवर, नीलेश छाजेड, माधुरी भोर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शंभर अंध बांधवांना छत्री वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवीन ननावरे यांनी केले. कार्यक्रमास विक्रांत गांगुर्डे, ओंकार बल्लाळ, भूषण दिवे, नितीन जाधव, शैलेश पांडव, राहुल चव्हाण, फारूक पठाण, चंद्रभान गुप्ता आदींचे सहकार्य लाभले.
अंध बांधवांना छत्री वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 1:11 AM