शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

उमराणेत कांदा घसरण सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 10:40 PM

उमराणे : येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या आवकेत दररोज वाढ होत असतानाच नवीन उन्हाळी कांदाही बाजारात विक्रीसाठी येऊ लागल्याने बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

ठळक मुद्देआठ दिवसांपासून दररोजच दरात दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण

उमराणे : येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या आवकेत दररोज वाढ होत असतानाच नवीन उन्हाळी कांदाही बाजारात विक्रीसाठी येऊ लागल्याने बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

गत सप्ताहाच्या तुलनेत लाल कांद्याच्या दरात तब्बल एक हजार सातशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पंधरा दिवसांपूर्वी लाल कांद्याची आवक कमी असल्याने बाजारभाव तेजीत होते. बाजारभाव तेजीत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

हेच बाजारभाव टिकून राहणे अपेक्षित असताना लाल कांद्याबरोबरच नवीन उन्हाळी कांदाही बाजारात विक्रीसाठी येऊ लागल्याने कांद्याची आवक वाढली आहे. परिणामी मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झाला असून, बाजारभाव आणखी कमी होईल, या भीतीपोटी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी गर्दी केली आहे.

त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून दररोजच दरात दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण होताना दिसून आली. दिवसेंदिवस कांद्याचे बाजारभाव कमी होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, काल बुधवारी (दि. १०) बाजार समितीत १,०३७ ट्रॅक्टर व पिकअप वाहनांमधून सुमारे २० हजार क्विंटल कांद्याची आवक झाल्याचा अंदाज असून, बाजारभाव कमीतकमी ८०१ रुपये, जास्तीत जास्त १,३७१ रुपये, तर सरासरी १,१०० रुपयांपर्यंत होते.

लाल कांदा बाजारभावात गेल्या आठ दिवसात दररोज होत असलेल्या घसरणीचा आलेख -:१ मार्च - कमी १,५०० रुपये, जास्त ३,०३५ रुपये, सरासरी २,४०० रुपये.२ मार्च - कमी १,५०० रुपये, जास्त २,८५० रुपये, सरासरी २,१५० रुपये.३ मार्च - कमी १,२०० रुपये, जास्त २,७५१ रुपये, सरासरी २,५०० रुपये.४ मार्च - कमी १,००० रुपये, जास्त २,२५० रुपये, सरासरी १,९५० रुपये.५ मार्च - कमी ८०० रुपये, जास्त २,००१ रुपये, सरासरी १,७५० रुपये,८ मार्च - कमी ८०१ रुपये, जास्त १,७३१ रुपये, सरासरी १,३५० रुपये,९ मार्च - कमी ९०१ रुपये, जास्त १,४९१ रुपये, सरासरी १,२२० रुपये,१० मार्च - कमी ८०१ रुपये, जास्त १,३७१ रुपये, सरासरी १,१०० रुपये.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा