उमराणे : होळी तसेच मार्च एंडमुळे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार साप्ताहिक सुट्टी वगळता पाच दिवस बंद ठेवण्यात आले होते. या काळात बाजार समितीअंतर्गत करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, बाजार समितीचे सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.रोखीचा अर्थव्यवहार, उत्तम दर्जाचा बाजारभाव, कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांची अधिक संख्या, इलेक्ट्रॉनिक भुईकाटे, आदी कारणांमुळे कांदा आवकेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला होळी, धूलिवंदन व गुड फ्रायडे तसेच मार्च एंड व साप्ताहिक सुट्टींमुळे गेल्या २७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत असे तब्बल नऊ दिवस बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. मात्र, साप्ताहिक सुट्ट्या वगळता बाजार समितीचे व्यवहार खऱ्या अर्थाने पाच दिवसच बंद होते; परंतु येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने कांदा खरेदी विक्रीच्या माध्यमातून दररोज दोन कोटी रुपयांची उलाढाल होते. त्या अनुषंगाने पाच दिवसांच्या सुट्टीदरम्यान सुमारे नऊ ते दहा करोड रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शिवाय मार्च एंडचा फटका बाजार समितीलाही बसला असून, दररोजचे एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न बघता सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. दरम्यान, नऊ दिवसांच्या बंदमुळे व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर गोण्या भरणार्या मजुरांसह हमाली कामगार, माल वाहतूकदार, हॉटेल व्यावसायिक, हार्डवेअर विक्रेते, आदी बाजार समितीवर अवलंबून असणार्या व्यवसायधारकांवर परिणाम झाला आहे.मार्च एंडमुळे गेल्या आठ दिवसांपासून बाजार समितीचे कामकाज बंद असल्याने शेतात काढून ठेवलेल्या लाल व उन्हाळी कांद्याचे विक्रीअभावी हाल झाले आहेत. लिलाव पूर्ववत झाल्यानंतर कांदा विक्रीसाठी एकच गर्दी होण्याची शक्यता असल्याने बाजारभावात घसरण होण्याची भीती निर्माण झाली आहे.- किशोर जाधव, शेतकरी, उमराणेसद्य:स्थितीत गेल्या आठ दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे माल विक्रीबाबत मोठे नुकसान झाले. बंदमुळे बाजार समितीअंतर्गत करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. मात्र, मार्च एंडमुळे व्यापारी वर्गाचेही कामकाज पूर्ण होणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही शेतकरी हित लक्षात घेऊन सोमवार, दि. ५ पासून लिलाव पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत.- सोनाली देवरे, मुख्य प्रशासक, उमराणे बाजार समिती
उमराणे बाजार समितीत दहा कोटींची उलाढाल ठप्पउमराणे : होळी तसेच मार्च एंडमुळे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार साप्ताहिक सुट्टी वगळता पाच दिवस बंद ठेवण्यात आले होते. या काळात बाजार समितीअंतर्गत करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, बाजार समितीचे सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.रोखीचा अर्थव्यवहार, उत्तम दर्जाचा बाजारभाव, कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांची अधिक संख्या, इलेक्ट्रॉनिक भुईकाटे, आदी कारणांमुळे कांदा आवकेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला होळी, धूलिवंदन व गुड फ्रायडे तसेच मार्च एंड व साप्ताहिक सुट्टींमुळे गेल्या २७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत असे तब्बल नऊ दिवस बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. मात्र, साप्ताहिक सुट्ट्या वगळता बाजार समितीचे व्यवहार खऱ्या अर्थाने पाच दिवसच बंद होते; परंतु येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने कांदा खरेदी विक्रीच्या माध्यमातून दररोज दोन कोटी रुपयांची उलाढाल होते. त्या अनुषंगाने पाच दिवसांच्या सुट्टीदरम्यान सुमारे नऊ ते दहा करोड रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शिवाय मार्च एंडचा फटका बाजार समितीलाही बसला असून, दररोजचे एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न बघता सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. दरम्यान, नऊ दिवसांच्या बंदमुळे व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर गोण्या भरणार्या मजुरांसह हमाली कामगार, माल वाहतूकदार, हॉटेल व्यावसायिक, हार्डवेअर विक्रेते, आदी बाजार समितीवर अवलंबून असणार्या व्यवसायधारकांवर परिणाम झाला आहे.मार्च एंडमुळे गेल्या आठ दिवसांपासून बाजार समितीचे कामकाज बंद असल्याने शेतात काढून ठेवलेल्या लाल व उन्हाळी कांद्याचे विक्रीअभावी हाल झाले आहेत. लिलाव पूर्ववत झाल्यानंतर कांदा विक्रीसाठी एकच गर्दी होण्याची शक्यता असल्याने बाजारभावात घसरण होण्याची भीती निर्माण झाली आहे.- किशोर जाधव, शेतकरी, उमराणेसद्य:स्थितीत गेल्या आठ दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे माल विक्रीबाबत मोठे नुकसान झाले. बंदमुळे बाजार समितीअंतर्गत करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. मात्र, मार्च एंडमुळे व्यापारी वर्गाचेही कामकाज पूर्ण होणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही शेतकरी हित लक्षात घेऊन सोमवार, दि. ५ पासून लिलाव पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत.- सोनाली देवरे, मुख्य प्रशासक, उमराणे बाजार समिती