शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ठोस पुरावा सिध्द न झाल्याने चिखलीकर, वाघ निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 1:38 PM

सुनावणीदरम्यान सलग दोन दिवस चाललेल्या युक्तीवादात सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या विविध न्यायनिवाड्यांचाही उहापोह झाला.

ठळक मुद्देठोस पुरावा सिध्द न झाल्याने निर्दोष मुक्तता या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते२ हजार पानांचे दोषारोपपत्र

नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर व शाखा अभियंता जगदीश वाघ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्विकारल्याप्रकरणी २०१३साली सापळा रचून अटक केली होती. यानंतर राज्यभरात चिखलीकर यांच्या नावे कोट्यवधींची मालमत्ता आढळून आल्याने हा खटला चांगलाच गाजला. दरम्यान, त्यांच्यावर अपसंपदेचा गुन्हाही नोंदविला गेला. लाचेच्या गुन्ह्यात सुनावणी पूर्ण होऊन सोमवारी (दि.२६) जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.जी.गिमेकर यांच्या न्यायालयात निकालाची सुनावणी होऊन न्यायालयाने दोघांना या गुन्ह्यात ठोस पुरावा सिध्द न झाल्याने निर्दोष मुक्तता केली.एका ठेकेदाराचे ३ लाख ६९ हजार रु पयांच्या बिलाची रक्कम मंजूर करण्याच्या मोबदल्यात चिखलीकर आणि वाघ यांनी ठेकेदाराकडे २२ हजार रु पयांची लाच मागितली होती. ठेकेदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० एप्रिल २०१३ रोजी सापळा रचून लाच घेतांना दोघांना पकडले होते. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विभागाने तपास करून सुमारे २ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. तपासादरम्यान, चिखलीकर यांच्याकडे १४ कोटी ६६ लाख १७ हजार ९४६ रु पयांची अपसंपदा आढळून आली. सुनावणी दरम्यान, २०१८ साली १२ जुलै रोजी न्यायालयातून लाचखोरप्रकरणातील मुळ तक्रारदाराच्या फिर्यादीची फाईल गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकारदेखील उघडकीस आला होता. जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशान्वये सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविला गेला आहे. मुळ तक्र ार गहाळ झाल्याने चिखलीकर प्रकरण पुन्हा प्रकाशझोतात आले होते. यामुळे या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. लाच प्रकरणातील सुनावणी पुर्ण होऊन दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद झाला. सुनावणीदरम्यान सलग दोन दिवस चाललेल्या युक्तीवादात सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या विविध न्यायनिवाड्यांचाही उहापोह झाला. सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी कामकाज पाहिले. या खटल्याचा निकाल न्यायालयाने सोमवारी देताना ठोस पुरावे संशयित चिखलीकर, वाघ यांच्याविरूध्द सिध्द होऊ न शकल्यामुळे त्यांना या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता केली.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग