नाशिक : साईनाथनगर चौफुली ते अमृतवर्षा कॉलनी रस्त्यालगतच अनधिकृत गुदामे आणि श्रीरामनगरमधील लहान-मोठे प्लॅस्टिक उद्योग कारखानांमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेची तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील साईनाथनगर चौफुली ते अमृतवर्षा कॉलनी या रस्त्यादरम्यान भंगार गॅरेज यासह विविध व्यावसायिकांनी व्यवसाय मांडले आहे. गेल्या एक वर्षापूर्वी याचठिकाणी एका वाहनाने पेट घेतल्याची घटनाही घडली होती. कोणतीही परवानगी नसतानाही सर्रासपणे व्यावसायिकांनी गुदाम वाढण्याचा जणू काही काही स्पर्धा सुरू केली आहे. श्रीरामनगर येथे सुमारे आठ ते दहा वर्षांपासून कोणतीही परवानगी नसतानाही सर्रासपणे चार ते पाच कारखाने सुरू आहे. त्यामधून निघणारा धूर आणि दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना नाक, घसा व डोळ्यांच्या विकाराचा सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वीच लागलेल्या भीषण आगीस अग्निशामक दलाने वेळीच आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे आणि समक्ष भेटून अनधिकृत कारखाने व गुदामे हटविण्याची मागणी करूनही अद्याप परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महापालिका प्रशासन जीवितहानी होण्याची वाट बघत आहे का? असा उपरोधिक प्रश्नही संतप्त नागरिकांनी केला आहे.
नाशिकच्या इंदिरानगर भागात अनधिकृ त गुदामे, प्लॅस्टिक कारखान्यांमुळे आरोग्यास धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:22 PM
लहान-मोठे प्लॅस्टिक उद्योग कारखानांमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देलहान-मोठे प्लॅस्टिक उद्योग कारखानांमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे महापालिका प्रशासन जीवितहानी होण्याची वाट बघत आहे का?