तालुक्यातील कळवाडी येथे मुख्य चौकात विना परवानगी चौथरा उभारून गुरुवारी (दि.७) मध्यरात्री पुतळा बसविण्यात आल्याची माहिती तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना शुक्रवारी सकाळी मिळाली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तहसीलदार राजपूत यांनी तलाठी निकम, मंडळ अधिकारी विधाते व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ढुमणे यांना घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या होत्या. तहसीलदार राजपूत यांनीही तातडीने कळवाडी गाठत शासनाच्या २ मे २०१७ च्या परिपत्रकाच्या पुतळा धोरणानुसार विनापरवानगी पुतळा बसविता येत नाही, असे स्पष्ट केले व ग्रामस्थांशी चर्चा करून पुतळा ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पुतळ्याची विधीवत पूजा करण्यात आली. येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या ताब्यात सदर पुतळा दिला जाणार आहे.
इन्फो
चौकशीचे आदेश
याप्रकरणी तहसीलदार राजपूत यांनी तालुका पोलिसांना चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या ग्रामपंचायतीची निवडणूक सुरू असल्यामुळे या प्रकारामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
विशेष सूचना : फोटो घेऊ नये.
===Photopath===
080121\08nsk_10_08012021_13.jpg
===Caption===
मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील विनापरवानगी बसविण्यात आलेला महापुरूषांचा पुतळा ताब्यात घेताना तहसीलदार चंद्रजीत राजपूत, तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते.