शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

अनधिकृत मोबाइल टॉवरचे काम पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:32 AM

मनपा प्रभाग क्रमांक ३ मधील साईनगर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले अनधिकृत मोबाइल टॉवरचे बांधकाम स्थानिक नागरिकांनी सोमवारी (दि.२९) दुपारी बंद पाडले. या अनधिकृत टॉवरबाबत प्रभाग समिती सभापती प्रियंका माने यांनी कळविल्यानंतर सदर टॉवरचे साहित्य मनपाने जप्त केले आहे.

पंचवटी : मनपा प्रभाग क्रमांक ३ मधील साईनगर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले अनधिकृत मोबाइल टॉवरचे बांधकाम स्थानिक नागरिकांनी सोमवारी (दि.२९) दुपारी बंद पाडले. या अनधिकृत टॉवरबाबत प्रभाग समिती सभापती प्रियंका माने यांनी कळविल्यानंतर सदर टॉवरचे साहित्य मनपाने जप्त केले आहे.  साईनगर येथे काही दिवसांपासून एका खासगी जागेवर मोबाइल टॉवरचे बांधकाम सुरू होते. कामाबाबत नागरिकांनी विचारणा केली असता ड्रेनेज लाईनचे काम सुरू असल्याचे सांगितले. नागरिकांना संशय आल्याने काम बंद करण्याचा प्रयत्न केला असता काम करणाºयांनी नागरिकांशी अर्वाच्च भाषा वापरली. त्यानंतर नागरिकांनी पंचवटी प्रभाग समिती सभापती प्रियंका माने यांच्याशी संपर्क केला. माने यांनी मोबाइल टॉवरचे काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली व स्थानिक नागरिकांना घेऊन पंचवटी पोलिसांत अनधिकृत मोबाइल टॉवर न होण्याबाबत अर्ज दिला. मनपा उपायुक्त रोहिदास बहिरम यांना अनधिकृत मोबाइल टॉवरची माहिती दिली. त्यानंतर पंचवटी विभागीय अधिकारी बी. वाय. शिंगाडे यांना सूचना देत सदर अनधिकृत टॉवरबाबत कारवाई करण्यास सांगितले. अतिक्रमण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन सदर अनधिकृत टॉवरचे चालू काम बंद पाडत साहित्य जप्त केले आहे.

टॅग्स :MobileमोबाइलNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका