नाशिक शहरात विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांचे अद्यापही फलक झळकत असताना सचिन पाटील यांच्या समर्थनार्थ लागलेल्या फलकांवरच वक्रदुष्टी होण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही, तसेच समर्थकांनी पाटील यांचे फलक नाशिक शहरात लावण्यामागचे कारणाचाही उलगडा होऊ शकलेला नाही. सचिन पाटील यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना वठणीवर आणून त्यांचे पैसे परत मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावल्याचे सांगण्यात येत असून, त्यासाठीच त्यांची बदली करू नये असे समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र अशा प्रकारच्या समर्थनार्थ चळवळी यापूर्वी यशस्वी होऊ शकलेल्या नाहीत ही वस्तुस्थिती असताना अशा प्रकारचे फलक नेमके कोणी लावले याचाही उलगडा होऊ शकलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार पाटील यांच्या सांगण्यावरूनच ही फलकबाजी केली जात असल्याचे व त्यातही पाटील यांच्या बदलीत हितसंबंध गुंतलेल्यांनीच ही मोहीम हाती घेतल्याची चर्चा होत आहे.
पोलीस अधीक्षकांच्या अनधिकृत फलकाची ‘बदली’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 4:17 AM