नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेगाव येथील टोल नाक्यावर स्थानिक वाहनधारकांकडून अनधिकृतपणे टोलची वसुली केली जात असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.१०) शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार योगेश घोलप यांनी दिली. नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेगाव टोल नाक्यावर २० किलोमीटरच्या परिघातातील वाहनधारकांकडून टोलवसुली करण्यात येत आहे. स्थानिक वाहनधारकांकडून टोलवसुली न करता पास देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आमदार योगेश घोलप व टोलवसुली अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत २० किलोमीटरच्या परिघातातील वाहनधारकांकडून टोलवसुली करण्यात येऊ नये, असा नियम असून, याबाबत टोलवसुली कंपनीने केंद्र शासनाकडे भरपाई मागावी, अशी सूचना शिंदे यांनी केली होती. तरीदेखील स्थानिक वाहनधारकांकडून टोलवसुली करण्यात येत आहे. यावेळी आमदार योगेश घोलप यांनी सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजेदेखील त्या भागातून शिवसैनिक व ग्रामस्थ घेऊन टोल नाक्यावर धडकणार असल्याचे स्पष्ट केले. बैठकीला नगरसेवक केशव पोरजे, शिवाजी भोर, अजिज सय्यद, नितीन चिडे, शिवा ताकाटे, नितीन खर्जुल, सुनील देवकर, मसुद जिलानी, योगेश देशमुख, योगेश म्हस्के, गुंडाप्पा देवकर, विकास गिते, बाळासाहेब लांबे, बबन धोंगडे, अशोक फडोळ, तुकाराम दाते आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. घोलप यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना पदाधिकाºयांची बैठक पार पडली. यावेळी आमदार योगेश घोलप, जगन आगळे, तालुका प्रमुख प्रकाश म्हस्के, सातपूर प्रभाग सभापती सुदाम ढेमसे, पंचायत समिती सदस्य अनिल जगताप, हरिभाऊ गायकर, राहुल ताजनपुरे यांनी टोल नाक्यावर मंगळवारी (दि.१०) शिवसेनेचा मोर्चा काढण्याचे आवाहन केले.
शिंदेगाव टोल नाक्यावर अनधिकृत टोलवसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 12:56 AM
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेगाव येथील टोल नाक्यावर अनधिकृतपणे टोलची वसुली केली जात असल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार योगेश घोलप यांनी दिली.
ठळक मुद्देस्थानिक वाहनधारकांकडून टोलवसुली न करता पास देण्यात यावेवाहनधारकांकडून टोलवसुली करण्यात येऊ नये