सातपूर : सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी मंडईबाहेरील रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अनधिकृत भाजीविक्रेत्यांना पोलीस बंदोबस्तात हटविण्याची कारवाई सायंकाळी महापालिकेच्या वतीने करण्यात आली.वारंवार सांगूनही आणि वेळोवेळी कारवाई करूनही उपयोग होत नसल्याने शुक्रवारी सायंकाळी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत मंडईबाहेर व्यवसाय करणाºया व्यावसायिकांचा भाजीपाला जप्त करण्यात आला. यावेळी व्यावसायिकांची पळापळ झाली होती. महापालिकेच्या चार वाहनांमध्ये हा माल जप्त करण्यात आला. या विके्रत्यांवर यापूर्वीही कारवाई करण्यात आली आहे. वारंवार सूचित करूनही हे व्यावसायिक ऐकत नसल्याने शुक्र वारी पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी काही विक्रेत्यांनी तीव्र विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस बंदोबस्तामुळे हा विरोध फार टिकू शकला नाही. या मोहिमेत मनपाचे कर्मचारी सहभागी झाले होते.त्याचप्रमाणे ही मोहीम पुढे कार्बन नाका शिवाजीनगर येथे गेली. तेथेही अनधिकृत व्यवसाय करणाºया व्यावसायिकांना हटविण्याची कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. या व्यावसायिकांना अन्यत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली असताना हे व्यावसायिक पुन्हा त्याच जागेवर व्यवसाय करीत असल्याने ही कारवाई करण्यात आली.
अनधिकृत भाजीविक्रे त्यांना हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 12:01 AM