पंचवटी : पंचवटीत अनेक ठिकाणी मनपा प्रशासनाच्या परवानगीने बांधकाम व्यावसायिकांनी अधिकृत इमारती बांधल्या खऱ्या, मात्र इमारतीत राहणाºया सदस्यांनी विविध व्यावसायिकांना इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या जागेत अनधिकृत गाळे उभारणीस परवानगी दिल्याने पंचवटी परिसरात अनेक ठिकाणी असलेल्या अधिकृत इमारतीत अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम केले असल्याचे चित्र दिसून येत आहे.विशेष म्हणजे महापालिकेच्या संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने कारवाई करणार कोण? असा सवाल नागरिकांनी केला आहे.एकीकडे महापालिका प्रशासनाकडून परिसरात असलेले अनधिकृत बांधकाम हटवून कारवाई केली जात असल्याचे सांगितले जाते तसेच अनधिकृत बांधकाम करणाºया अनेक नागरिकांना महापालिका नोटिसा बजावून कारवाईचा इशारा देते मग इमारतीच्या प्रवेशद्वारावर पत्र्याचे शेड टाकून गाळे बांधकामांकडे महापालिकेचे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सध्या हिरावाडी परिसरातील अनेक इमारतींच्या ठिकाणी अशाप्रकारे इमारतीत असलेल्या व्यावसायिक गाळ्यांना लागून सदस्यांचा ये-जा करण्याचा मार्ग असलेल्या जागेवरच पत्र्याचे पक्के गाळे बांधकाम केलेले आहे.विशेष म्हणजे इमारतीत राहणाºया सदस्यांचा महिन्याचा मेंटेनन्सचा खर्च सुटावा यासाठी सदस्यांच्या परवानगीने इमारतीच्या दोन प्रवेशद्वारापैकी एका बाजूचा प्रवेश बंद करून त्याठिकाणी अनधिकृत पत्र्याचे शेड उभारणी करण्याची क्लृप्ती काहींनी लढविली आहे.
पंचवटी परिसरात अधिकृत इमारतीत अनधिकृत गाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:41 AM