लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक पश्चिम मतदारसंघातील सेनेच्या बंडखोरांसमोर हतबलता व्यक्त केलेल्या शिवसेनेच्या संजय राऊत यांनी भाजपातून बंडखोरी करून राष्टÑवादीकडून उमेदवारी करणारे आमदार बाळासाहेब सानप यांची सदिच्छा भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात या भेटीचे अनेक अर्थ काढले जाऊ लागले आहे. सानप यांनी बंडखोरी करून बरे केले नाही अशी समजूत राऊत यांनी काढली की, सानप यांच्याशी आपले असलेले जुने नाते त्यांच्या बंडखोरीनंतरही कायम आहेत असे दाखवून पूर्वमधील शिवसैनिकांना त्यांच्या पाठीशी उभे केले याचा उलगडा मात्र होऊ शकलेला नाही. मात्र या भेटीमुळे भाजपची अस्वस्थतता वाढीस लागली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बऱ्याचशा विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय घटना घडामोडी घडल्या. त्यात भाजपने नाशिक पूर्वमधून विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने अखेरच्या क्षणी सानप यांनी राष्टÑवादीत प्रवेश करून उमेदवारीही घेतली. त्याचबरोबर नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदे यांनी माघारीच्या दिवशी नॉटरिचेबल राहून भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्यासमोर अडचण उभी केली. राज्यात महायुती झालेली असतानाही दोन्ही पक्षांकडून एकमेकांना विश्वासात घेतले जात नसल्याच्या तक्रारी होत असून, युतीच्या बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी दोन्ही बाजूंच्या नेत्या मंडळींकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून गुरुवारी नाशिक दौºयावर आलेले शिवसेनेचे उत्तर महाराष्टÑाचे संपर्कप्रमुख संजय राऊत यांनी पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेच्या नगरसेवक व बंडखोरांची बैठक घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र बंडखोरांकडून उमेदवारीचे समर्थन करून माघार न घेण्याचा ठाम निर्धार केल्याने संजय राऊत यांनी हतबलता व्यक्तकेली व त्यासंदर्भातील अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला. त्याच संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी आवर्जुन पंचवटीत भेट देऊन भाजपचे नाराज व राष्टÑवादीचे उमेदवार आमदार बाळासाहेब सानप यांची सदिच्छा भेट घेतली. या दोघांमध्ये २० ते २५ मिनिटे बंद खोलीत चर्चाही झाली. या चर्चेत काय झाले हे समजू शकले नसले तरी, चर्चा संपवून बाहेर आल्यानंतर राऊत व सानप यांच्या दोघांच्या चेहºयावरील समाधान बºयापैकी राजकीय गोष्टींना खतपाणी घालून गेले.मुळात बाळासाहेब सानप हे भाजपचे बंडखोर असून, सध्या राष्टÑवादीचे उमेदवार म्हणून ते भाजपच्या विरोधात निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे राऊत हे सानप यांना ‘आता माघार घ्या’असे सांगू शकत नाही किंवा सांगितले तरी सानप यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने ते ‘माझे काय चुकले’, असा प्रश्न मतदारांना करीत आहेत तोच प्रश्न ते राऊत यांनाही विचारू शकतात. सानप यांच्या भेटीचे राऊत यांनी समर्थन केले असून, त्यामागे जुन्या संबंधाचा संदर्भ दिला आहे. राऊत व सानप यांचे जुने संदर्भ गृहीत धरले तर पूर्वमधील शिवसैनिक भाजपच्या उमेदवारापेक्षा पक्ष नेत्याच्या जुन्या संबंधाला जागतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.