नाशिक : जिल्ह्यातील अनुकंपाधारक उमेदवारांच्या भरतीबाबत प्रशासकीय पातळीवरील उदासीनता वारंवार समोर येऊनही अनुकंपा भरतीबाबतची अधिकृत आकडेवारी अद्यापही समोर आलेली नाही. अनुकंपाधारकांना आवश्यकतेनुसार त्या-त्या विभागातून नियुक्ती दिली जात असल्याचा दावा केला जात आहे, तर किती अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेण्यात आले याची ठोस माहिती मात्र उपलब्ध होत नाही.जिल्हा परिषदेत अनुकंपावर ६२ कर्मचाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करण्यात आल्यामुळे इतर विभागातील अनुकंपाधारकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. जिल्हा परिषदेप्रमाणेच महसूल आणि सामाईक यादीतील अनुकंपाधारकांना कधी नियुक्ती दिली जाणार याविषयीची विचारणा अनुकंपाधारक करीत आहेत. मात्र त्यांना अपेक्षित माहिती मिळत नसल्याने भरतीचे निकष काय आणि प्राधान्यक्रम कसा ठरविणार याविषयी अनुकंपाधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेची व्याप्ती आणि कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे तेथील अनुकंपाधारकांना आकडा मोठा वाटतो. अन्य विभागांमध्येदेखील अनुकंपाधारकांना सामावून घेतले जात असल्याचे उत्तरे अनुकंपाधारकांना मिळत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांत भरतीच झालेली नाही. अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्यादेखील जागा रिक्त आहेत. एका टेबलावरील अधिकाºयास अनेक जबाबदाºया पार पाडाव्या लागतात. कर्मचारी संख्या अपुरी असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याचे आणि कामाला विलंब होत असल्याचे शासकीय अधिकºयांकडूनच सांगितले जात असतानाही अनुकंपाधारकांची भरती नेमकी किती टक्के आणि कोणत्या निकषावर होते? असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्णात ‘क’ वर्गातील ४८९, तर ‘ड’ वर्गातील ३०७ इतके अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. निवडणूक कामासाठी अनुकंपाधारक उमेदवारांची मदत घेण्याबाबतचे निवेदनदेखील अनुकंपाधारकांना दिले होते. मात्र तेथेही त्यांना संधी देण्यात आलेली नाही. महसूलसह अन्य विभागांतदेखील अनेक जागा रिक्त असतानाही अनुकंपाधारकांना सामावून घेण्याबाबत अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने प्रतीक्षा यादी लांबली असल्याची तक्रार अनुकंपाधारक करीत असताना अनुकंपाधारकांना सामावून घेतले जात असल्याचे अधिकारी सांगत आहेत.यादी खुली करण्याची मागणीज्या ज्या विभागात अनुकंपाधारक आहेत त्यांची यादी प्राधान्यक्रमानुसार लावण्यात यावी, त्याचप्रमाणे गेल्या पाच वर्षांत किती अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेण्यात आले, सामाईक यादीतील उमेदवार किती याची देखील माहिती प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनीभागावर लावण्यात यावी अशी मागणी अनुकंपाधारकांकडून केली जात आहे.
अनुकंपा तत्त्वावरील भरतीबाबत अनिश्चितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:35 PM
जिल्ह्यातील अनुकंपाधारक उमेदवारांच्या भरतीबाबत प्रशासकीय पातळीवरील उदासीनता वारंवार समोर येऊनही अनुकंपा भरतीबाबतची अधिकृत आकडेवारी अद्यापही समोर आलेली नाही. अनुकंपाधारकांना आवश्यकतेनुसार त्या-त्या विभागातून नियुक्ती दिली जात असल्याचा दावा केला जात आहे, तर किती अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेण्यात आले याची ठोस माहिती मात्र उपलब्ध होत नाही.
ठळक मुद्देप्रतीक्षा कायम : याद्यांच्या माहितीबाबत संभ्रम