शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सभापती आडकेंच्या नकारघंटेने भाजपात अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:43 AM

महापालिकेच्या स्थायी समितीत सोळापैकी नऊ सदस्य एकट्या भाजपाचे असताना शिवसेनेचा लटका विरोध अत्यंत गांभीर्याने घेऊन आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या विषयाला रोखल्याने भाजपांतर्गत वातावरण ढवळून निघाले आहे.

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीत सोळापैकी नऊ सदस्य एकट्या भाजपाचे असताना शिवसेनेचा लटका विरोध अत्यंत गांभीर्याने घेऊन आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या विषयाला रोखल्याने भाजपांतर्गत वातावरण ढवळून निघाले आहे. खुद्द फरांदे या विषयावर नाराज असल्याचे वृत्त आहे तर सभागृह नेता दिनकर पाटील यांनी सदरचा विषय पक्ष बैठकीत मंजूर करण्याचे ठरले होते त्यानुसार आग्रह धरल्याची बाजू आमदारांकडे मांडली आहे. त्यामुळे सभापती हिमगौरी आडके यांची कार्यपद्धती आणखीनच पक्षाच्या दृष्टीनेदेखील अडचणीत वाढ करणारी ठरली आहे.  मध्य नाशिकमध्ये महिला रुग्णालयाचा विषय आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. त्यांना भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या जवळ वाहनतळाच्या जागेत हे रुग्णालय साकारण्याचे निश्चित झाले होते तसा शासन निर्णय जारी करण्यात आला होता. मात्र माजी आमदार वसंत गिते यांच्या समर्थकांनी त्यास विरोध केल्याने गिते विरुद्ध फरांदे असा सामना रंगला होता. त्यानंतरही फरांदे या त्यासाठी आग्रही राहिल्याने अखेरीस महापालिकेकडून नाममात्र दराने आरक्षित जागा घेण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीच्या बैठकीत मांडला होता. गेल्या आठवड्यात झालेल्या या बैठकीत शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यास काही प्रमाणात विरोध केला आणि गायकवाड सभागृहाच्या वाहनतळाला अडचण होईल काय आणि अन्य प्रश्न उपस्थित केले. या जागेवर रुग्णालय बांधण्यास स्थगिती आली, असेही सांगण्यात आले परंतु प्रशासनाने केलेल्या खुलाशानुसार स्थगिती नसल्याचेही स्पष्ट झाले. विशेष म्हणजे विरोधी पक्षात असूनही मुशीर सय्यद यांनी महिला रुग्णालय त्या परिसरातील नागरिकांची गरज असल्याचे सांगून समर्थन दिले. दिनकर पाटील यांनीही हा विषय मंजूर करण्याची गरज असल्याचे सांगितले असताना हिमगौरी आडके यांनी तो अभ्यासासाठी तहकूब ठेवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.पक्षातील आमदारांच्या प्रतिष्ठेचा विषय बाजूला ठेवल्याने आडके यांची कामकाजाची वादग्रस्त पद्धतदेखील स्पष्ट झाली आहे. याच बैठकीत महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरवाढीला सर्वच सदस्यांनी कडाडून विरोध केला असताना त्यांनी दिलासादायक पद्धतीने दरही कमी केले नाहीत आणि दुसरीकडे मात्र पक्षाच्या आमदारांचा प्रस्ताव झिडकारून आमदारांनाच आव्हान दिल्याची चर्चा रंगली आहे. यासंदर्भात समितीचे एक सदस्य दिनकर पाटील यांनी आमदार फरांदे यांच्याकडे बाजू मांडली असून, पक्ष बैठकीत हा विषय मंजूर करण्याचे ठरले असतानादेखील आडके यांनी अगोदरच हा विषय नामंजूर करण्याचे विषयपत्रिकेवर लिहून आणले होते. त्याचे पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे आडके यांनी ठरवून आमदारांच्या विषयांना खोडा घातल्याची चर्चा होऊ लागली आहे.पाटील यांचा आडके यांना घरचा आहेर..स्थायी समिती आणि महासभेत विषय मंजूर होतात, परंतु त्याचे इतिवृत्त होण्याच्या आतच अंमलबजावणीदेखील सुरू होते. त्यास सभागृह नेते दिनकर पाटील यांनी विरोध करून भाजपाला आणि विशेष करून सभापती हिमगौरी आडके यांना घरचा आहेर दिला आहे. यापुढे अशाप्रकारे निदर्शनास आल्यास प्रशासन जबाबदार राहील व कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असे पाटील यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.यापूर्वी कपाटकोंडी फोडण्यासाठी शहरातीलरस्ते नऊ मीटर रुंद करण्याचा विशेषाधिकार आयुक्तांनी वापरून स्थायी समितीसमोर प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी केवळ विषय मंजूर झाल्यांनतर इतिवृत्त मंजुरीची वाट न बघता आयुक्तांनी अधिसूचना जारी केली होती. त्यावेळीच पाटीलयांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळेच आता त्यांनी आडके आणि मुंढे या दोघांनाएकाचवेळी अडचणीत आणण्याची तयारी सुरू केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल