नाशिक : मूत्रपिंड निकामी झाल्याच्या आजारपणावर उपचार घेणाऱ्या एका ४८ वर्षीय रुग्णाने सदर आजारपणाला कंटाळून नैराश्यापोटी शनिवारी (दि. ९) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुन्हा घडली. महिनाभरापूर्वीदेखील अशीच घटना घडली होती.याबाबत भद्रकाली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जवाहरलाल गुप्ता (रा. घोटी) यांना किडनीचा आजार असल्याने जानेवारीअखेर त्यांना उपचारार्थ संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी (दि. ८) त्यांच्यावर डायलिसीस करण्यात आले. त्यानंतर शनिवारी (दि. ९) सकाळी त्यांनी अचानक रुग्णालयाच्या तिसºया मजल्यावरील पुरु ष सामान्य कक्षाची खिडकी उघडून उडी घेतली. त्यामुळे गंभीर मार लागल्याने जवाहरलाल यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार गुप्ता यांनी आजारपणाला कंटाळू व आर्थिक कारणातून आत्महत्या केली असावी. सुमारे महिनाभरापूर्वी १२ जानेवारीला दुपारी मालेगाव येथील रहीमखान नबीखान पठाण (५२) यांनी डायलिसीस कक्षाची काच फोडून खाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्याअगोदरदेखील एका रुग्णाने अशाच पद्धतीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.संंरक्षक जाळ्या कधी बसविणार?नैराश्यापोटी रुग्ण रुग्णालयाच्या खिडक्यांमधून स्वत:ला झोकून देत जीवनयात्रा संपवित आहेत. महिनाभराच्या अंतरावर दोन घटना घडल्या असून, रुग्णालयाच्या प्रशासनाने तत्काळ खिडक्यांना संरक्षक जाळ्या बसविण्याची मागणी होत आहे. ही मागणी मागील अनेक महिन्यांपासून केली जात आहे; मात्र अद्याप जाळ्या बसविण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला नाही. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.गुप्ता यांच्या पत्नीची लेखी पूर्वकल्पनागुप्ता यांच्या पत्नीने त्यांना उपचारार्थ दाखल केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला लेखी पूर्वकल्पना देत ‘आजारपणाला कंटाळून गुप्ता हे उडी मारण्याचा प्रयत्न करतील’, असे कळविले होते, अशी माहिती समजते. येथील सुरक्षा रक्षकांची संख्या कमी असून, प्रत्येक कक्षात सुरक्षा रक्षक वाढविण्याची मागणी आहे. प्रशासनाचा हलगर्जीपणादेखील रुग्णांच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.
‘संदर्भ’च्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 2:05 AM
मूत्रपिंड निकामी झाल्याच्या आजारपणावर उपचार घेणाऱ्या एका ४८ वर्षीय रुग्णाने सदर आजारपणाला कंटाळून नैराश्यापोटी शनिवारी (दि. ९) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुन्हा घडली. महिनाभरापूर्वीदेखील अशीच घटना घडली होती.
ठळक मुद्देमहिनाभरानंतर दुसरी घटना । नैराश्यातून संपविले जीवन