चांदवड : तालुक्यातील तळवाडे गावातील प्रत्येक कुटुंबातील एकाने व गावातील सर्व व्यावसायिकांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे सेव्हिंग खाते उघडले असून, या गावात डिजिटल व्यवहार सुरू झाले आहेत. तळवाडे गावाने कॅशलेस होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केल्याने देशातील डिजिटल ग्रामच्या यादीत तळवाडेचा समावेश झाला आहे. सरपंच संगीता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे मालेगाव विभागाचे डाक अधीक्षक नागेश्वर रेड्डी व नवी मुंबई रिजनच्या पोस्टमास्तर जनरल शोभा मधाळे यांच्या उपस्थितीत डिजिटल सक्षम ग्रामचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी खातेदारांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे वरिष्ठ प्रबंधक परमेश्वर क्षीरसागर, चांदवड उपविभागाचे डाक निरीक्षक नितीन अहिरे, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक राजीव दुबे यांनी मनोगत व्यक्त केले. चांदवडचे पोस्टमास्तर संजय गांगुर्डे, डाक आवेक्षक अनिल सोनवणे, डी. आर. दिवेकर, शाखा डाकपाल महेंद्र हिरे, विवेक मोहोड, रईस पटेल, सुदाम आहेर, साहेबराव जाधव, पोपट गोडसे, मुख्याध्यापक पवार यांच्यासह ग्रामस्थ व डाक कर्मचारी उपस्थित होते. तळवाडेचे पोस्टमास्तर दत्तात्रय चव्हाण, ग्रामीण डाक वितरक चिंधू चव्हाण यांनी डिजिटल ग्रामची संकल्पना मांडली. माजी सरपंच हरिभाऊ चव्हाण, गुलाब काटे, राजेंद्र पवार, पोलीसपाटील वर्षा काटे, ग्रा.पं.सदस्य दादाभाऊ चव्हाण, निवृत्ती चव्हाण, मारु ती काटे, अण्णा काटे व अमोल चव्हाण, कैलास काटे यांचे सहकार्य लाभले.तळवाडे गावाने टपाल बँकिंगचा पर्याय स्वीकारत कॅशलेसच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. या गावात एकही बँक वा पतसंस्था नसल्याने कोणताही आर्थिक व्यवहार करण्यासाठी चांदवड शहरात जावे लागत असे.
‘मेरा अभिमान सक्षम ग्र्राम’ उपक्रमांतर्गत तळवाडे गाव ठरले डिजिटल सक्षम ग्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 6:35 PM