सातपूर : देशातील गरोदर माता आणि नवजात बाळांचे मृत्यू रोखण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री मातृवंदन योजना’ लागू केली असून, या योजनेंतर्गत महापालिकेच्या सातपूर येथील मायको रुग्णालयात गेल्या दोन वर्षांत एक हजार ७०० रुग्णांनी लाभ घेतला आहे.देशात गरोदर माता आणि नवजात बाळांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामागे घरीच बाळंतपण होणे, नवजात बालकांना वेळीच उपचार न मिळणे. मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी केंद्रसरकारने २०१७ साली ‘प्रधानमंत्री मातृवंदन योजना’ लागू केली आहे. जात, धर्म, पंथ, वय, गरीब, श्रीमंत, प्रांत असे कोणतेही बंधन नाही. ही योजना फक्त पहिल्या प्रसूतीसाठी लागू आहे. गरोदर राहिल्यानंतर महिलेने नजीकच्या रुग्णालयात नाव नोंदणी करून युनिक आयडी नंबर घेणे आवश्यक आहे. त्यानंतर रुग्णालयाच्या माध्यमातून पुढची तपासणी, सोनोग्राफी, रक्ततपासणी, औषधोपचार, घ्यावयाची काळजी याचीमाहिती वेळोवेळी दिली जाते. प्रसूतीपर्यंत सर्व उपचार मोफत केले जातात. फक्त रुग्णालयाकडे आधार कार्ड आणि बँक खाते आवश्यक आहे. महापालिकेच्या मायको रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रुचिता पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेरी कोलूर आणि त्यांचे सहकारी आशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या योजनेचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. त्यामुळे या योजनेत सहभागी १७०० महिला रुग्णांना या योजनेचा लाभ मिळू शकला आहे.चार वेळा तपासणीपहिल्यांदा गरोदर राहिलेल्या मातांसाठी प्रामुख्याने ही योजना आहे. अशा गरोदर मातेने सर्वप्रथम रुग्णालयात रीतसर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा रुग्णास युनिक आयडी दिला जातो. नियमित चार वेळा तपासणी आवश्यक आहे. रुग्णास प्रसूतीपर्यंत तीन टप्प्यांत पाच हजार रुपये बँक खात्यात जमा केले जातात. दरम्यानच्या काळात सर्व उपचार, तपासण्या, सोनोग्राफी, रक्ततपासणी, औषधोपचार मोफत केले जातात. बाळ १६ वर्षाचा युवक होईपर्यंत त्याची काळजी (लसीकरण वगैरे) घेतली जाते. मात्र प्रसूती रुग्णालयातच झाली पाहिजे अशी अट आहे.प्रधानमंत्री मातृवंदन योजना सर्व जाती, धर्म, वय, आर्थिक स्थिती यांना लागू आहे. मात्र महिला रु ग्ण आणि तिच्या पतीचे आधार कार्ड बँकेशी संलग्न असले पाहिजे. मायको रु ग्णालयाच्या माध्यमातून रु ग्णांचे आधार कार्ड काढून देण्याची सोय उपलब्ध करून दिली जात आहे. तसेच रुग्णांचे पोस्टात खाते उघडण्यासाठी पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनारु ग्णालयात बोलावून घेतले जाते. दर शनिवारी गरोदर मातांनी घ्यावयाची काळजी, निगा, उपचार यांबाबत समुपदेशन आणि त्यांना मार्गदर्शन केले जाते. तीन वर्षांत प्रसूती झालेल्या रु ग्णांनी लाभ घेतला नसेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो.- रु चिता पावसकर, वैद्यकीय अधिकारी,मायको रु ग्णालय, सातपूर
मातृत्व योजने अंतर्गत दोन वर्षांत १७०० महिलांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:11 AM