नाशिक : सिंहस्थाच्या नावाखाली अनावश्यक कामांवर भर देत वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याची अहमहमिका महापालिकेपासून ते जिल्हा प्रशासनातील विविध विभागांमध्ये लागलेली असताना साधू-महंतांचा विनाकारण कोप होऊ नये यासाठी स्थानिक आखाड्यांच्याही हातावर दुरुस्ती व सुविधांच्या नावाखाली महापालिकेने सिंहस्थनिधीचा ‘प्रसाद’ टेकवत खुश करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने शहरातील काही आखाड्यांसह धार्मिक संस्थांसाठी सुमारे ९४ लाख रुपये खर्चाच्या विविध कामांच्या निविदा काढल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात केंद्र व राज्य सरकारच्या निधीसह महापालिकेच्या निधीतून कोट्यवधींची कामे सुरू आहेत. तपोवनात साधू-महंतांच्या निवासासाठी सुमारे २९५ एकर जागेत साधुग्राम उभारले जात आहे. याठिकाणी प्रमुख तीन आखाड्यांसह त्यांच्या सुमारे ७५० खालसांची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय शहरात असलेल्या आखाड्यांच्या मठ-आश्रमांसह काही धार्मिक संस्थांच्या जागेतही साधू-महंतांची निवासाची व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
सिंहस्थाच्या नावाखाली अनावश्यक कामांवर भर
By admin | Published: May 20, 2015 1:51 AM