नाशिकच्या उंटवाडी, जगतापनगर, कालिका पार्क, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, आदी भागांत गेल्या काही वर्षांपासून सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी ही समस्या निदर्शनास आणून देत परिस्थितीत सुधारणा करण्याची नागरिकांनी मागणी केली होती. यावर महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, साहाय्यक अभियंता प्रदीप गवई, वायरमन दीपक शिर्के, किशोर वाघ यांनी रहिवाशांसह परिसरात ठिकठिकाणी पाहणी केली. पाच महिन्यांनंतर ही आश्वासनपूर्ती झाली. येथील आरडी सर्कल, अनमोल नयनतारा भागात ४०० मीटर, तर तिडकेनगर, कर्मयोगीनगर भागातील संभाजी व्यायामशाळेजवळ ३०० मीटर असे एकूण ७०० मीटर भूमिगत केबलचे काम करण्यात आले असून, उच्च दाबाच्या मुख्य वाहिनीतून विद्युतपुरवठा कार्यान्वित केला. विद्युतभाराची विभागणी केली. सुमारे पाच हजार वीज मीटर ग्राहकांची सततच्या खंडित वीजपुरवठ्यातून सुटका होणार आहे.
कर्मयोगीनगरमध्ये भूमिगत केबलचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:14 AM