लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आपल्या बाळाच्या नटखट हालचाली प्रत्येक पालकाला हव्याहव्याशा वाटतात.. पण बाळ मोठे होते, तेव्हा मात्र पालकांचे लक्ष प्रथमत: त्याच्या हाताकडे जाते. तो उजवा असला तर ठीक; पण डावखुरा असल्यावर मात्र ते कमालीचे अस्वस्थ होतात. त्यानंतर सुरू होते डावखुºयाला उजवा करण्याची धडपड. पण त्यामुळे मुलाचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते. हा धोका पालकांनी ओळखण्याची गरज असून, डावखुरेअसणे हे वेगळे किंवा कमीपणाचे लक्षण नसून उजव्यांइतकेच डावखुरेही प्रतिभावंत असल्याचे समजून घेत डावखुºयामधील उजवेपणाही समजून घेण्याची गरज जागतिक डावखुरे दिनाच्या निमित्ताने निर्माण झाली आहे.सामान्यपणे उजव्या हाताचा वापर करणाºयांची संख्या अधिक प्रमाणात असल्याने शाळा-महाविद्यालयातील खुर्चीच्या डेस्कवर लिहिण्यासाठीची जागा उजव्या बाजूने असते. त्यामुळे डावखुºयांना या डेस्कवर लिहिताना अडचण येते, प्रसाद घेणे, आरती ओवाळणे यांसारख्या धार्मिक क्रिया उजव्या हाताने कराव्यात, असे मानले जाते. अशा वेळीही डावखुºयांची अडचण होते. डाव्या हाताने लिहिणाºयांचा हात शब्दांवरून फिरतो. त्यामुळे अक्षर पुसण्याची वा धुसर होण्याची शक्यता असते. शाळेत बेंचवर उजव्या बाजूला बसल्यास विद्यार्थ्यांच्या उजव्या हातास संबंधितांच्या डावा हात लागू शकतो. हस्तांदोलन करताना समोरचा माणूस उजवा हात पुढे करतो. डावखुरी माणसं आपला डावा हात पुढे करतात. तेव्हा गोंधळ उडतोच. तसेच सर्वच यंत्र आणि साहित्यांची रचना उजव्या हात वापरणाºयांच्या सोयीची केलेली असते. त्याचप्रमाणे वाहनाची बनावट उजव्यांसाठीच असते. असे असतानाही डावखुºया व्यक्ती सर्व यंत्र कुशलतेने हाताळतात. ही त्यांना निसर्गदत्त मिळालेले वरदानच असल्याने त्यांची समन्वय क्षमताही उजव्यांपेक्षा अधिक असून, डावखुरे कोणत्याही क्षेत्रात कमी नसल्याचे महात्मा गांधी, बराक ओबामा, चार्ली चॅप्लीन, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, युवराज सिंग, सौरव गांगुली, जहीर खान, इरफान पठाण यासारख्या दिग्गजांच्या उदाहरणांवरून समजून घेण्याची गरज असल्याची भूमिका डावखुºयांचा क्लबच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. या उपाययोजना शक्य सगळी मुले एकत्र असताना जाणीवपूर्वक ‘डावखुरे किती आहेत’ याची गणना करावी. त्यामुळे आपल्यासारखे बरेच आहेत, याचा संबंधितांना अंदाज येईल व त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.डावखुºया विद्यार्थ्यांना शाळेत बाकाच्या डावीकडे बसवावे, त्यामुळे लिहितांना त्याच्या हाताचा दुसºया विद्यार्थ्याला स्पष्ट होणार नाही.४ लिहिताना कागद रेषेच्या डावीकडे धरावा. तो उजवीकडे कललेला असावा. पेन्सिल किंवा पेनाची पकड उलटी नसावी.४ डावखुºया मुलांना उंचावर बसवले की त्यांना स्वत: लिहिलेले वाचायला सोपे जाते.डावखुºया व्यक्तींच्या तुलनेत उजव्यांचे प्रमाण जवळपास ९० टक्क्यांनी अधिक आहेत. त्यामुळे बहुतांश डावखुºया व्यक्तींची काहीसी गैरसोय होते. मात्र निसर्गानेच अशा व्यक्तींना समन्वय क्षमता अधिक दिली असल्याने अनेकजण डावखुरे असतानाही त्यांनी उजवी कामगिरी केल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे डावखुºया सवयी बदलून उजवे करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. असे केल्याने उलट मुलांचे खच्चीकरण होण्याचाच धोका अधिक आहे.- आनंद खोत, सदस्य, लेफ्ट हॅण्डर्स असोसिएश्न डाव्या हाताचे वळण असणाºयांची काही चांगली वैशिष्ट असतात. तसेच त्यांच्या काही अडचणी असतात. यासंदर्भात चार वर्षांपूर्वी लेफ्ट हॅण्डर्स क्लब स्थापन केला. त्यातून डावखुºया मुलांसाठी आणि पालकांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम तसेच विविध स्पर्धादेखील घेण्यात आला आहे. डावखुरेपणा हे व्यंग नाही, तसेच ते दैवीही नाही. वैज्ञानिकतेचा भाग आहे. त्यामुळे या मुलांना चांगली वागणूक द्यावी यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.- नयना आव्हाड, संस्थापक लेफ्ट हॅण्डर्स क्लब
डावखुऱ्यांचे उजवेपण समजून घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:43 PM
नाशिक : आपल्या बाळाच्या नटखट हालचाली प्रत्येक पालकाला हव्याहव्याशा वाटतात.. पण बाळ मोठे होते, तेव्हा मात्र पालकांचे लक्ष प्रथमत: त्याच्या हाताकडे जाते. तो उजवा असला तर ठीक; पण डावखुरा असल्यावर मात्र ते कमालीचे अस्वस्थ होतात. त्यानंतर सुरू होते डावखुºयाला उजवा करण्याची धडपड. पण त्यामुळे मुलाचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते. हा धोका पालकांनी ओळखण्याची गरज असून, डावखुरेअसणे हे वेगळे किंवा कमीपणाचे लक्षण नसून उजव्यांइतकेच डावखुरेही प्रतिभावंत असल्याचे समजून घेत डावखुºयामधील उजवेपणाही समजून घेण्याची गरज जागतिक डावखुरे दिनाच्या निमित्ताने निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देगैरसमज दूर व्हावेत : डावखुऱ्याला उजवा करण्याची धडपड खच्चीकरण करणारी