नायगाव : निफाड तालुक्यातल्या पिंपळगाव निपाणी येथील विविध कार्यकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष ज्ञानेश्वर खाडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने आपले वर्चस्व करत जय मल्हार पॅनलचा पराभव केला.सर्वसाधारण कर्जदार गटातून ज्ञानेश्वर रामभाऊ खाडे (२१३), शिवनाथ दत्तात्रय नाईक (२०८), सुभाष सुकाजी बांगर (१९४), अशोक खंडू बोडके (२०६), चंद्रकांत त्र्यंबक बोडके (२०७), मोहन निवृत्ती बोडके (१९४), ज्ञानेश्वर निवृत्ती बोडके (१९५), ज्ञानेश्वर महादू बोडके (१९०) यांनी विजय मिळवला. तर जगन काशिनाथ नाईक (१३३), सोमनाथ शांताराम बांगर (१३१), दशरथ निवृत्ती बोडके (१२५), नंदू रमेश बोडके (१३७), बाबू मुरलीधर बोडके (१३८), रवींद्र एकनाथ बोडके (१३४), सुदाम सुकदेव बोडके (१३८), संजय सुकदेव बोडके (१३४) यांना पराभव पत्करावा लागला. महिला राखीव गटातील दोन्ही जागांवर शेतकरी विकास पॅनलच्या जनाबाई सूर्यभान खाडे (२०८) व रंजना आनंदा बोडके (२०२) यांनी विजय मिळवला. यशोदा खंडेराव खाडे (१४३), भीमाबाई मल्हारी बोडके (१३१) या पराभूत झाल्या. अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेवर नागेश परशुराम कर्डक (२११) यांनी बाजी मारली. तर गौतम वाघू कर्डक (१४२) यांना हार पत्करावी लागली. भटक्या विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्गातील एका जागेसाठी रघुनाथ रामदास बोडके (२१३) यांनी शरद लहानु बोडके (१४३) यांच्यावर विजय मिळवला. इतर मागास प्रवर्गाच्या एका जागेवर कैलास रामभाऊ कडवे (२१०) यांनी प्रकाश सीताराम आहिरे (१३९) यांना धोबीपछाड दिला. निवडणूक निर्णय अधिकारी साबळे यांनी विजयी उमेदवारांची घोषणा करताच समर्थकांनी आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला. माजी आमदार दिलीप बनकर समर्थकांनी पुन्हा एकदा निर्विवाद बहुमत मिळवून सत्ता राखली आहे.
शेतकरी विकासची निर्विवाद सत्ता
By admin | Published: December 17, 2015 11:13 PM