नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीत असलेल्या रेमंड रिसिव्हिंग सबस्टेशनची कमी करण्यात आलेली क्षमता पुन्हा पूर्ववत २५ वरून ५० एमव्हीए करण्यात यावी, अशी मागणी औद्योगिक वसाहतीतील एका शिष्टमंडळाने खासदार हेमंत गोडसे यांची सोमवारी (दि.९) भेट घेऊन केली.दरम्यान, याबाबत खासदार गोडसे यांनी तत्काळ संबंधितांशी संपर्क साधत याबाबत चर्चा केली असून, लवकरच रेमंड रिसिव्हिंग सबस्टेशनची क्षमता पूर्ववत करण्यात येणार असल्याचे आश्वासन संबंधित प्रशासनाने खासदार गोडसे यांना दिले आहे. औद्योगिक वसाहतीतील रेमंड रिसिव्हिंग सबस्टेशनची क्षमता पूर्वी ५० एमव्हीए इतकी होती. मात्र मधल्या काळात प्रशासनाने येथील ५० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र काढून ते मालेगाव येथे बसविले. तर मालेगावचे २५ एमव्हीए क्षमतेचे रोहित्र येथे बसवण्यात आले. यामुळे येथील रोहित्रामध्ये वीज साठवणूक क्षमता कमी झाली आहे. परिणामी यामुळे वाडीवऱ्हे आणि गोंदे येथील औद्योगिक वसाहतीचा विजेचा दाब रेमंड रिसिव्हिंग सबस्टेशनवर टाकणे शक्य नाही. हे सबस्टेशन केवळ अत्यावश्यकसाठीच राखीव झालेले आहे. त्यामुळे गोंदे औद्योगिक वसाहतीमधील अन्य उद्योग, उद्योजकांना वीजपुरवठ्यासंबंधी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे येथील एका शिष्टमंडळाने खासदार गोडसे यांची भेट घेऊन सबस्टेशनची क्षमता पूर्ववत करण्याची मागणी केली.दरम्यान, साखदार गोडसे यांनी वीज अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत याबाबत चर्चा केली. तसेच नाशिकरोड येथील पारेषण कंपनी विभाग आणि महावितरण कंपनी प्रशासन कार्यालयाशी पत्रव्यवहार करत येथील सबस्टेशनमध्ये पुन्हा ५० एमव्हीए क्षमतेचा रोहित्र बसविण्याची मागणी केली आहे. लवकरच येथे ५० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येईल, असे आश्वासन खासदार गोडसे यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात गोंदे औद्योगिक वसाहतील डी. आर. दुबे, अतुल देशमुख, अण्णा आरोटे आदी उद्योजकांचा शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे उपस्थित होते.गोंदे येथील औद्योगिक वसाहतीतील वीजपुरवठ्याची क्षमता पुन्हा पूर्ववत २५ वरून ५० एमव्हीए करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे वीजपुरवठा पूर्ववत होणार असून, औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.- हेमंत गोडसे, खासदार, नाशिक.
गोंदे वसाहतीतील उपकेंद्राची क्षमता पूर्ववत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 9:33 PM
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीत असलेल्या रेमंड रिसिव्हिंग सबस्टेशनची कमी करण्यात आलेली क्षमता पुन्हा पूर्ववत २५ वरून ५० एमव्हीए करण्यात यावी, अशी मागणी औद्योगिक वसाहतीतील एका शिष्टमंडळाने खासदार हेमंत गोडसे यांची सोमवारी (दि.९) भेट घेऊन केली.
ठळक मुद्देखासदारांना साकडे : उद्योजकांपुढे अडचणींचा डोंगर