शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

रेड झोनमध्येही दैनंदिन व्यवहार पूर्ववत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 10:00 PM

नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेला लॉकडाउनचा चौथा टप्पा शुक्रवारपासून सुरू होत असून, त्यासाठी नवीन नियमावली ठरवून देण्यात आलेली असली तरी, प्रामुख्याने नागरिकांचे दैनंदिन व्यवहार पूर्ववतच राहणार असून, दुकाने, विविध व्यवसाय याकाळात सुरू राहतील. मात्र सायंकाळनंतर संचारबंदी कायम राहणार असून, नागरिकांना पूर्वीप्रमाणेच त्याचे पालन करावे लागणार आहे.

नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेला लॉकडाउनचा चौथा टप्पा शुक्रवारपासून सुरू होत असून, त्यासाठी नवीन नियमावली ठरवून देण्यात आलेली असली तरी, प्रामुख्याने नागरिकांचे दैनंदिन व्यवहार पूर्ववतच राहणार असून, दुकाने, विविध व्यवसाय याकाळात सुरू राहतील. मात्र सायंकाळनंतर संचारबंदी कायम राहणार असून, नागरिकांना पूर्वीप्रमाणेच त्याचे पालन करावे लागणार आहे.राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ पाहता राज्य सरकारने लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा करताना आता रेड झोन व नॉन रेड झोन असे दोनच झोन ठेवले आहेत. नॉन रेड झोनमध्ये सर्व सुविधा व सेवा सुरळीत ठेवण्याची मुभा देण्यात आली असली तरी, रेड झोनमध्ये मात्र काही निर्बंध कायम आहेत. चौथ्या टप्प्याचे लॉकडाउन घोषित करताना शासनाने काही नियमावली तयार केली आहे. नाशिक व मालेगाव महापालिका क्षेत्राचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आल्याने व शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना असल्याने पूर्वीप्रमाणेच शहरात संचारबंदी जारी होऊन सर्व प्रकारची दुकाने, व्यवसाय बंद राहतील की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांमध्ये त्याबाबतचा संभ्रमही कायम होता. दुकाने बंद राहण्याच्या भीतीने खरेदीसाठी नागरिकही मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडल्याचे चित्र दिसून आले. नागरिकांमध्ये लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याबाबत असलेला संभ्रम पाहता, त्या संदर्भात शासनाने स्पष्टीकरण जारी केले.----------------------------३ मेनंतर लॉकडाउन व संचारबंदीतून ज्या व्यवसायांना, व्यापाराला सूट देण्यात आली ती सूट यापुढच्या काळातही कायम ठेवण्यात येणार आहे. विशेष करून अत्यावश्यक सेवांबरोबरच सर्व प्रकारची दुकाने, लहान-मोठे व्यवसाय, खासगी, शासकीय कार्यालये नियमितपणे सुरू ठेवण्याची मुभा आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक