नाशिक : दर बारा वर्षांनी नाशिकच्या गोदाकाठावर भरणारा साधू-संतांचा मेळा अर्थात कुंभमेळ्याची छायाचित्रकार संजय जगताप यांनी टिपलेल्या छायाचित्रांची थेट संयुक्त राष्टÑ संघटनेच्या ‘युनेस्को’ने दखल घेतली असून, कुंभमेळा जागतिक वारसा ठरावा, यादृष्टीने पुढचे पाऊल टाकले आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याला जागतिक वारसा मिळावा, यासाठी मुंबईच्या अखिल भारतीय संगीत नाटक अकादमीच्या वतीने प्रयत्न सुरू होते. अकादमीने जगताप यांचा गौरव करत त्यांनी काढलेल्या शेकडो छायाचित्रांमधून निवडक छायाचित्रे ‘द अॅडव्हायझर बॉडी फॉर इन्टॅजिबल कल्चरल हेरिटेज’द्वारे (एबीआयसीएचयू) युनेस्कोला सादर केली होती. यामध्ये जगताप यांनी काढलेल्या काही चित्रफितींचाही समावेश होता. सरकारच्या अकदमीचे सदस्य असलेल्या उषा राव यांनी जागतिक वारसा म्हणून कुंभमेळा ओळखला जावा, यासाठी प्रयत्न सुरू करत उत्कृष्ट छायाचित्रे शोधण्यास सुरुवात केली होती. जगताप यांनी आपल्या कलेचा खुबीने वापर करत बोलक्या छायाचित्रांच्या माध्यमातून कुंभमेळा कॅ मेºयात कैद केला. त्यांची छायाचित्रे अकादमीच्या पसंतीस खरी उतरली. राव यांनी जगताप यांचे अभिनंदन करत त्यांची छायाचित्रे नाशिकच्या कुं भमेळ्याला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यासाठी पूरक ठरतील, असा आशावाद पत्रातून व्यक्त केल्याचे जगताप यांनी सांगितले.छायाचित्रणाच्या आवडीपोटी जोपासलेल्या कलेमुळे मला माझ्या शहराला आंतरराष्टÑीय स्तरावर पोहचविण्याची संधी मिळाली. याचा मला विशेष आनंद होत असून, कुं भमेळ्यात तहान-भूक विसरून केलेल्या छायाचित्रणाचे चीज झाले, असे वाटते. नाशिकच्या कुं भमेळ्याला जागतिक वारसा म्हणून घोषित करावे, हीच अपेक्षा आहे. - संजय जगताप, छायाचित्रकार
कुंभमेळ्याची ‘युनेस्को’कडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 12:27 AM