शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

अन्यायग्रस्त आणि विस्थापित शिक्षकांचा पुन्हा उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 2:09 AM

जिल्हा परिषदेतील शिक्षक बदली प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काही प्रमाणात कारवाई केली असली तरी हा निव्वळ बनाव असल्याचा आरोप अन्यायग्रस्त आणि विस्थापित शिक्षकांनी केला आहे. अर्जामध्ये खोटी माहिती भरूनही संबंधितांवर अत्यंत सौम्य कारवाई केल्याने आता अन्यायग्रस्त शिक्षकांनी पुन्हा एकदा नोव्हेंबरमध्ये आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

नाशिक : जिल्हा परिषदेतील शिक्षक बदली प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काही प्रमाणात कारवाई केली असली तरी हा निव्वळ बनाव असल्याचा आरोप अन्यायग्रस्त आणि विस्थापित शिक्षकांनी केला आहे. अर्जामध्ये खोटी माहिती भरूनही संबंधितांवर अत्यंत सौम्य कारवाई केल्याने आता अन्यायग्रस्त शिक्षकांनी पुन्हा एकदा नोव्हेंबरमध्ये आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.  नाशिक जिल्हा विस्थापित शिक्षक व आंतरजिल्हा बदली कृती समितीची बैठक अध्यक्ष सुभाष अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शिक्षक बँक सभागृह येथे झाली. यावेळी शिक्षकांनी आपणाला अद्यापही न्याय मिळाला नसल्याने अत्यंत खडतर सेवा करावी लागत असल्याचे आणि चुकीची माहिती भरूनही सोयीच्या ठिकाणी ते काम करीत आहेत. जिल्हा परिषदेने या संदर्भातील निर्णय घेताना सोयीचे अर्थ आणि नियम लावून निर्णय घेतले आहेत. यामुळे तक्रार करणाºयांना शिक्षा आणि ज्यांच्याविरुद्ध तक्रारी आहेत त्यांच्याविषयी मवाळ भूमिका घेण्यात आल्यामुळेच शिक्षक बदल्यांमधील अनियमितता कायम असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला.२०१८ मधील रॅन्डममधील शिक्षकांना व पतीपत्नी एकत्रीकरण करावे यासाठी १२ नोव्हेंबरपासून दिवाळी सुट्टीत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.बदल्या होऊनही बदलीची, संवर्गनिहाय यादी अद्याप प्रकाशित करण्यात आलेली नाही. बदलीसाठी आॅनलाइन खोटी माहिती भरून, खोटे अपंग प्रमाणपत्र, विवाहित असूनही अविवाहित, पुनर्विवाह होऊन घटस्फोटित, पक्षघातसारखी बोगस माहिती शिक्षकांनी भरलेली आहे. त्यांच्यावर मात्र कारवाई करण्यात आलेली नाही. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनीही गैरसोयीच्या बदल्या सोयीच्या कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.दरम्यान, या पूर्वीही विस्थापित शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बारा दिवस साखळी उपोषण व विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. आता पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे अशी माहिती सुभाष साइनकर, अनिल वाडेकर, अर्चना धोंडगे, मंगला मोरे अशा एकूण २३ शिक्षकांच्या स्वाक्षºया आहेत.खोटी माहिती भरणाºया शिक्षकांची त्रयस्थ पथकाकडून नव्याने शारीरिक तपासणी करावी व दोषी असणाºया शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करून रॅन्डम शिक्षकांना त्या जागी पदस्थापना द्यावी, खोटी माहिती भरणाºया शिक्षकांना प्रोत्साहन देऊन गैरव्यवहार करून पाठीशी घालणाºयांची चौकशी करून सेवेतून निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदTeacherशिक्षक