नाशिक : भल्या सकाळी रांगोळ्या आणि पताक्यांनी सजविलेले रस्ते, त्यानंतर ढोल-ताशांच्या निनादात ब्रह्मध्वज नाचवत निघालेले तरुण आणि पारंपरिक वेशभूषेत असलेल्या महिलांचे नृत्य अन् मर्दानी खेळ... विविध रस्त्यांवरून निघालेल्या स्वागतयात्रांमुळे नाशिककरांनी रविवारी (दि.१८) आगळीवेगळी उत्साहवर्धक सकाळ अनुभवली. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा शहर व परिसरात जल्लोषपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. नागरिकांनी आपापल्या घरांवर गुढी उभारून हिंदू नववर्ष साजरा केला. रविवारपासून शालिवाहन शके १९४०ला प्रारंभ झाला. गुढीपाडव्याच्या सणानिमित्त शहरातील विविध भागांमध्ये पारंपरिक स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दिनकराच्या साक्षीने ढोल-ताशांच्या गजरात रस्त्यांवरून स्वागतयात्रांचा जल्लोष पहावयास मिळाला. घरोघरी गुढ्या उभारून आणि तोरणे बांधून दरवर्षीच हिंदू नववर्षाचा प्रथम दिन साजरा केला जातो. परंतु गेल्या काही वर्षांनी शहराच्या विविध भागांत पारंपरिक वेशभूषेत निघणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रा, त्यात सहभागी धार्मिक संस्था आणि आधुनिकतेची कास धरत निघणाºया दुचाकीफेºया यामुळे वातावरणाचा नूरच बदलून जातो. पाडव्याचा दिवस, त्यातच रविवारची सुटी असल्याने शहरातून तब्बल पंधरा ते वीस ठिकाणांहून स्वागतयात्रा निघाल्या. भद्रकालीतील साक्षी गणेश, इंदिरानगर, गंगापूररोड, सातपूर, कॉलेजरोडवरील कुलकर्णी चौक अशा विविध ठिकाणी निघालेल्या यात्रांनी शहराच्या उत्सवी वातावरणात उत्साहाची भर घातली. पारंपरिक वेशभूषेत ब्रह्मध्वज खांद्यावर घेऊन निघालेल्या पुरुष मंडळीबरोबरच महिलाही सहभागी झाल्या होत्या. लेजीम पथके, ढोल पथके, महापुरुषांच्या वेशभूषेतील युवक, बालकांनी लक्ष वेधून घेतले.मंदिरातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशचांदीच्या गणपती मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारण्यात आली होती. विशेष म्हणजे गणरायांच्या मूर्तीभोवती गुढ्या उभारून प्रत्येक गुढीवर पर्यावरणाविषयी प्रबोधन करणारे संदेशांचे फलक झळकविण्यात आले होते. ‘पर्यावरणासाठी झाडे लावा, देश वाचवा’, ‘झाडे-झुडुपे नका करू नष्ट, श्वास घ्यायला होतील कष्ट’ यासह शांती व अन्नाचा आदर याविषयीचेही घोषवाक्यांचे फलक लावण्यात आले होते.भक्तांच्या गर्दीने बहरला गोदाकाठनववर्ष स्वागतासाठी शहरात सर्वत्र भगवे वातावरण निर्माण झाले असतानाच गोदाकाठी भक्तांची मांदियाळी जमली होती. शहरातून निघालेल्या या धार्मिक मिरवणुकीतून हजारो भाविक गोदाकाठी एकत्र आले. धार्मिक पूजापाठ करून त्यांनी नववर्ष स्वागत केले. नरेंद्राचार्य महाराज संस्थान तथा जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज भक्तसेवा मंडळ नाशिक यांच्या वतीने सकाळी शहरातून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. रविवार कारंजा परिसरात नववर्ष स्वागताचा जल्लोषनववर्ष स्वागतयात्रा समितीकडून स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मागील चार वर्षांपासून या भागातून स्वागतयात्रा काढण्याची परंपरा पाळली जात आहे. राज्य सराफ सुवर्ण महासंघाचे गिरीश टकले, अॅड. नितीन बाबूराव ठाकरे यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. साक्षी गणपती मंदिरापासून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यात्रा गाडगे महाराज पुतळा, मेनरोडने धुमाळपॉर्इंटवरून रेडक्रॉस सिग्नल, एम.जी. रोडवरून वकीलवाडी, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोडवरून चांदवडकर लेन, दिल्ली दरवाजामार्गे भाजी पटांगणावर पोहचली. या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे १ कि.मी. रांगोळी. यात्रा मार्गावर सहभागी महिला रांगोळी काढत होत्या. विविध धार्मिक-सांस्कृतिक संस्थांचे एकूण १५ चित्ररथ यात्रेत सहभागी झाले होते. ढोलवादन, मंगळागौर खेळ, दुचाकीस्वार महिलांनी लक्ष वेधले.
नववर्ष स्वागताचा अनुपम सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:01 AM
नाशिक : भल्या सकाळी रांगोळ्या आणि पताक्यांनी सजविलेले रस्ते, त्यानंतर ढोल-ताशांच्या निनादात ब्रह्मध्वज नाचवत निघालेले तरुण आणि पारंपरिक वेशभूषेत असलेल्या महिलांचे नृत्य अन् मर्दानी खेळ... विविध रस्त्यांवरून निघालेल्या स्वागतयात्रांमुळे नाशिककरांनी रविवारी (दि.१८) आगळीवेगळी उत्साहवर्धक सकाळ अनुभवली.
ठळक मुद्दे गुढीपाडवा : शहरात घुमला ढोल-ताशांचा गजर ठिकठिकाणी प्रबोधनाची गुढी