नाशिक : सिडकोतील पवननगर येथील गणपती मंदिरामागे राहणाऱ्या कमलेश सोनवणे या तरुणाचा वालदेवी धरणात बुडून झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.११) दुपारच्या सुमारास घडली आहे.सिडकोतील पवननगर परिसतील पाच ते सहा तरुण शुक्रवारी वालदेवी धरणात पोहण्यासाठी गेले होते. या तरुणांनी वालदेवी धरणाच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेतल्यानंतर ते बाहेर आले. त्यावेळी त्यांचा मित्र कमलेश सोनवणे हा त्यांच्याबरोबर पाण्याबाहेर आला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांचा गोधळ उडाला. सर्वांनी मिळून कमलेशची शोधाशोध सुरू केली. परंतु कमलेश कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडाल्याची शंका निर्माण झाल्याने स्थानिक गावकऱ्यांच्याही ही घटना निदर्शनास आली. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिस पथकासोबत कमलेशचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांच्या मदतीने कमलेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यास स्थानिकांना यश आले. दरम्यान, गेल्या दोन महिन्यात वालदेवीत पोहोण्यासाठी गेल्याल्यांपैकी तरुण बुडाल्याची दुसरी घटना आहे. यापूर्वी १६ एप्रिल रोजी वालदेवी धरणात सिडको परिसरातूनच पोहोण्यासाठी गेल्याल्या सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतरही या भागात कोणतीही सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आलेली नाही. त्यामुळे वारंवार अशाप्रकारच्या घटना घडत आहे.
दुर्दैवी : सिडकोतील तरुणाचा वालदेवी धरणात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 7:21 PM
नाशिक सिडकोतील पवननगर येथील गणपती मंदिरामागे राहणाऱ्या कमलेश सोनवणे या तरुणाचा वालदेवी धरणात बुडून झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.११) दुपारच्या सुमारास घडली आहे.. यापूर्वी १६ एप्रिल रोजी वालदेवी धरणात सिडको परिसरातूनच पोहोण्यासाठी गेल्याल्या सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
ठळक मुद्देवालदेवी धरणात बुडून तरुणाच मृत्यूमित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडालामागील दोन महिन्यात वालदेवीतील दुसरी घटना