नाशिक : रविवार पेठेमधील निमाणी चाळीतील देशमुख यांच्या घरात वीजप्रवाह उतरल्याने संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वीजप्रवाहाचा धक्का लागून घराच्या उंबरठ्यावर प्रमिला देशमुख (७७) कोसळल्या. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी असलेला सनी सावंत या युवकाने त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली; मात्र त्याला अपयश आले. अत्यवस्थ प्रमिला यांना उचलण्याचा सनीने प्रयत्न केला, मात्र त्यालाही वीजप्रवाहाचा धक्का बसला व तो जमिनीवर कोसळला. या घटनेत प्रमिला व सनी या दोघांचा मृत्यू झाल्याने निमाणी चाळीवर शोककळा पसरली आहे.गुरुवारी (दि.७) मध्यरात्री झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसानंतर शहरामधील वीजपुरवठा रात्री खंडित झाला होता. तसेच सकाळी काही भागांमध्ये वीजपुरवठा विस्कळीत राहिला. रविवार पेठेमधील अत्यंत जुन्या कौलारू घरांची चाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निमाणी चाळमधील घर क्रमांक ६१० ब मध्ये राहणाºया प्रमिला देशमुख या संध्याकाळी बाहेर पडत असताना उंबरठ्यावर त्यांना वीजप्रवाहाचा धक्का बसला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून जवळच ओट्यावर बसलेल्या सनीने त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. सनीने मदतीसाठी घेतलेली धाव अपयशी ठरली आणि देशमुख यांच्यासह सनीवर काळाने झडप घातली. जिल्हा रुग्णालयात काहीकाळ तणावजिल्हा रुग्णालयात जमलेले नातेवाईक व सनीच्या मित्रांचा शोक अनावर झाल्याने त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस दाखल झाले. जमावाचा कायदेशीर प्रक्रि या पार पाडण्यास विरोध होता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच सनीचा मृतदेह घरी नेण्याचा प्रयत्न होऊ लागल्याने पोलिसांनी जमावाला रोखले. बंदोबस्तावरील पोलिसांनी घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर पोलीस कुमक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आली. पोलिसांनी जमावाला पांगविल्यानंतर तणावाची परिस्थिती निवळली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलिसांत नोंद करण्याची प्रक्रि या सुरू होती.
घरात वीजप्रवाह उतरल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 1:11 AM
नाशिक : रविवार पेठेमधील निमाणी चाळीतील देशमुख यांच्या घरात वीजप्रवाह उतरल्याने संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वीजप्रवाहाचा धक्का लागून घराच्या उंबरठ्यावर प्रमिला देशमुख (७७) कोसळल्या. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी असलेला सनी सावंत या युवकाने त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली; मात्र त्याला अपयश आले. अत्यवस्थ प्रमिला यांना उचलण्याचा सनीने प्रयत्न केला, मात्र त्यालाही वीजप्रवाहाचा धक्का बसला व तो जमिनीवर कोसळला. या घटनेत प्रमिला व सनी या दोघांचा मृत्यू झाल्याने निमाणी चाळीवर शोककळा पसरली आहे.
ठळक मुद्देरविवार पेठ : निमाणी चाळीतील घटना; मदतीसाठी गेलेल्या युवकालाही गमवावे लागले प्राण