नाशिक: महापालिकेच्या सर्व शाळांची सध्या असलेली वेळ बदलविण्यासाठी शिक्षण समिती पुन्हा एकदा आग्रही असून, लवकरच आयुक्तांची भेट घेणार आहे. सध्या महापालिकेच्या सर्व शाळा सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत भरतात. त्या पूर्वीप्रमाणेच सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भराव्या यासाठी आयुक्तांची भेट घेण्याचा निर्णय गुरुवारी (दि.११) शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, महापालिकेने अर्थसंकल्पात यथायोग्य तरतूद करूनही अद्याप शाळांना निधी वर्ग झाला नसून त्यामुळे आता १५ आॅगस्टपर्यंत मुलांना दोनपैकी एक गणवेश देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.महापालिका शिक्षण समितीची बैठक सभापती प्रा. सरिता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी भवनात पार पडली. महापालिकेच्या एकूण १२८ शाळा होत्या. त्यातील अनेक शाळा बंद करून तर काहींचे समायोजन करून ९० शाळा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांचा सोेयीचा विचार करून एकाच सत्रात शाळा भरविण्याचा निर्णय तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या संमतीने घेतला. एकाचवेळी वर्ग भरत असल्याने अनेक शाळांमध्ये एकाच वेळी शंभर ते दीडशे मुलांना शिकवायला लागते. त्यामुळे मुलांना नीट शिकवले जात नाही, अशी तक्रार आहे. त्यामुळे यापूर्वीदेखील हा विषय चर्चिला गेला होता. शिक्षण समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्यानंतर शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी सदरचा निर्णय आयुक्तांचा असल्याचे सांगितल्यानंतर आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करण्याचे ठरविण्यात आले.मुलींना सायकली देणारमहापालिकेच्या शाळेतील मुलांना आत्कृष्ट करण्यासाठी शाळेतील विद्यार्थिनींना सायकली देण्याचा प्रस्ताव असून, त्यावरदेखील यावेळी चर्चा करण्यात आली.महापालिकेच्या शाळांमधील गणवेश हे शालेय स्तरावरच खरेदी करण्यात येत असतानादेखील गतवेळेस प्रमाणेच यंदाही विलंब झाला आहे. आता शाळांच्या शिल्लक निधीचा हिशेब घेऊन देण्यात येणार असून, त्यानंतर सर्व खरेदीप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने १५ आॅगस्टपर्यंत दोनपैकी एक गणवेश मिळू शकेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात दुसरा गणवेश देण्यात येणार आहे. याशिवाय मुलांना बूट आणि सॉक्स तसेच वॉटर प्युरिफायर खरेदी करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला.
मनपा शाळेत १५ आॅगस्टपर्यंत गणवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:56 AM
महापालिकेच्या सर्व शाळांची सध्या असलेली वेळ बदलविण्यासाठी शिक्षण समिती पुन्हा एकदा आग्रही असून, लवकरच आयुक्तांची भेट घेणार आहे. सध्या महापालिकेच्या सर्व शाळा सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत भरतात. त्या पूर्वीप्रमाणेच सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भराव्या यासाठी आयुक्तांची भेट घेण्याचा निर्णय गुरुवारी (दि.११) शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
ठळक मुद्देसमितीची बैठक : वेळ बदलण्यासाठी आयुक्तांची बैठक घेणार