नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेष मिळण्याची तयारी शिक्षण विभागाने पुर्ण केली असली तरी, यंदा कोरोनामुळे राज्य सरकारने सर्व प्रकारच्या खर्चावर निर्बंध आणल्यामुळे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना गणवेष देण्याबाबतचे मार्गदर्शक तत्वे जाहीर केली मात्र त्यासाठी लागणाºया निधीबाबत चुप्पी साधल्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना गणवेष मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.नाशिक जिल्हा परिषदेच्या सुमारे साडेतीन हजार शाळांमध्ये दोन लाख, ४१ हजार विद्यार्थी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेत असून, ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी असल्यामुळे त्यांना गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडून शालेय गणवेष देण्याची योजना राबविली जात आहे. त्यातून विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी त्याच बरोबर पालकांवरील अतिरीक्त आर्थिक भार हलका होवून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थी एकाच गणवेषात दिसावेत हा शासनाचा हेतू असला तरी, अनेक वेळा शासनाने विद्यार्थ्यांना शालेय गणवेष देण्याबाबत आपल्या पुर्वीच्याच निर्णयात बदल केले आहेत. पुर्वी शाळांनीच गणवेषासाठी कपडा खरेदी करून गावातील शिवणकाम करणाऱ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी गणवेष शिवून घेण्यास सुरूवात करण्यात आली. परंतु हलका व उच्च प्रतिचा कपडा खरेदी करण्याच्या बाबी घडू लागल्याने त्यातून तक्रारी वाढल्यामुळे गणवेष वाटप वादात सापडले होते. त्यानंतर गावोगावच्या शालेय व्यवस्थापन समितीमार्फत कापड खरेदी करून शाळेतच गणवेष देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातही त्रुटी निर्माण झाल्याने शिवून घेतलेले गणवेष खरेदी करून ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. पाच वर्षापुर्वी तत्कालीन सरकारने विद्यार्थ्यांना गणवेषाचे पैसे त्यांच्या बॅँक खात्यात थेट जमा करून त्या आधारे त्यांनीच गणवेष खरेदी करावे असा निर्णय घेतला. त्यातही अनेक अडचणी निर्माण झाल्या. विद्यार्थ्यांचे बॅँक खाते उघडण्यास होणारा विलंब, त्यांचे खाते क्रमांकातील त्रुटी व विद्यार्थ्यांना गणवेषासाठी पैसे खर्च न करता पालकांनीच स्वत:साठी खर्च करून टाकल्याच्या तक्रारींमुळे पाचही वर्षे विद्यार्थ्यांच्या गणवेषाचा प्रश्न गाजत राहिला. गेल्या वर्षापासून मात्र शासनाने प्रती विद्यार्थ्याला वर्षाकाठी दोन गणवेष वाटप करण्यासाठी विद्यार्थ्याच्या बॅँक खात्यात सहाशे रूपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी व त्याच्या पालकाने दुकानातून त्याची खरेदी करावयाची आहे व तसे हमीपत्र शाळेला लिहून देण्यास सुरूवात केली आहे.यंदा मात्र कोरोनामुळे शाळा अजुन उघडलेल्या नाहीत. त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासनाने विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेषासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. त्यासाठी गत वर्षाचीच पद्धत अवलंबविण्याचे ठरविण्यात आले. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या पाहता त्यासाठी सुमारे पंधरा कोटी रूपयांच्या निधीची गरज आहे. मात्र शासनाने निधी देण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्याच्या सुचना दिलेल्या नाहीत. कोरोनामुळे शासनाने आरोग्य विभागाच्या खर्चाला प्राधान्य दिले असून, शिक्षण विभागाला निधी मिळण्याविषयी अनिश्चितता दिसू लागली आहे.
गणवेषाची मार्गदर्शक तत्वे जाहीर, मात्र निधीची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 5:03 PM
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेष मिळण्याची तयारी शिक्षण विभागाने पुर्ण केली असली तरी, यंदा कोरोनामुळे ...
ठळक मुद्देयंदा विद्यार्थ्यांना प्रतिक्षाशिक्षण विभागाची तयारी पुर्ण