गेल्या दोन महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्त व महापालिका अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडकोतील पवननगर भाजी मार्केटमध्ये भाजीपाला घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने पास योजना लागू केली होती. जेमतेम काही दिवसच सुरू असलेली ही मोहीम नंतर बंद करण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या कमी दिसत असला तरी संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवून प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत; परंतु सिडको भागातील पवननगरसह त्रिमूर्ती चौक, दत्त चौक, उपेंद्रनगर, माऊली लॉन्स यासह इतर ठिकाणी भरत असलेल्या भाजीबाजारात भाजीपाला घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची पास अथवा टोकन योजना सुरू नसल्याने नागरिक भाजीपाला घेण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
सिडकोच्या भाजीबाजारात विनापास प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:10 AM