शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
3
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
4
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
5
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
6
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
7
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
8
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
9
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
10
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
11
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
12
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
13
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
15
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
16
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
17
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
18
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
19
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ

पदाधिकाऱ्यांची एकी, अधिकाऱ्यांची दुफळी

By admin | Published: November 06, 2015 11:24 PM

सिन्नर : गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकाऱ्यांचे मतभेद चव्हाट्यावर

सिन्नर : सिन्नर पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत दरवेळी आपसात भांडणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये ‘एकी’चे तर अधिकाऱ्यांमध्ये ‘दुफळी’चे प्रदर्शन सभागृहात घडले. गटविकास अधिकारी धनंजय जगताप व सहायक गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांचे मतभेद आढावा बैठकीत चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. दरवेळी लोकप्रतिनिधींच्या आरोप-प्रत्यारोपांच्या बैठकी अनुभवणाऱ्या खातेप्रमुखांना यावेळी मात्र गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकाऱ्यांच्या नाराजी नाट्याचा खेळ पाहण्याची वेळ आली.सुमारे वर्षभर सिन्नर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून काम पाहिलेले सहायक गटविकास अधिकारी वाघ व गटविकास अधिकारी म्हणून सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेले जगताप यांच्यातील मतभेद लपून राहिलेले नाही. वाघ प्रभारी गटविकास अधिकारी असताना त्याचे पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबतही सूत जुळले नव्हते. सभापती संगीता काटे यांनी वाघ यांची बदली न झाल्यास कामकाजात भाग न घेण्याचा व बहिष्काराचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर पंचायत समितीला गटविकास अधिकारी म्हणून जगताप लाभले. जगताप व वाघ यांचेही विविध कारणांवरून उघड मतभेद दिसून येत असल्याने पंचायत समितीचे प्रशासन चर्चेचा विषय झाले आहे. प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून वर्षभर काम करताना आढावा बैठक हाताळणारे वाघ शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत चक्क शेवटच्या खुर्चीवर आसननस्थ झालेले दिसून आले. पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना खातेप्रमुखांजवळ पुढील खुर्चीवर येऊन बसण्याची विनंती केल्यानंतरही त्यांनी ऐकले नाही. त्यावरून उभय अधिकाऱ्यांमधील मतभेद टोकाला गेल्याचे दिसून आले. आढावा बैठकीत विरोधी पदाधिकाऱ्यांमध्ये एकी दिसून आली असताना दुसऱ्या बाजूला अधिकाऱ्यांमध्ये मतभेद दिसून आल्याने पंचायत समितीचा कारभार सुरळीत व्हावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.