रामदास शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्कपेठ -दगडाला देवत्व प्राप्त करून देण्याचं काम शिल्पकार करत असतो. तसं दगडाला स्वत:चे काही आस्तित्व नसतांना त्यातून जर कलाकृती साकारल्या असतील तर त्याच दगडाचे महत्व किती वाढून जाते याचा प्रत्यय येणारा एक आगळावेगळा उपक्रम पेठ तालुक्यातील जोगमोडी बीटातील प्राथमिक शिक्षकांनी राबवला आणी एक कलाविष्काराची निर्मिती झाली. शिक्षकाला अध्यापन करावयाचे म्हणजे शैक्षणिक साहित्य हे आवश्यक असतेच. त्यासाठी शिक्षक आपल्या कल्पनेतून पाठयक्र माला अनुसरून साहित्य तयार करत असतो. या साहित्याचे सादरीकरण दर मिहन्याला होणाऱ्या शिक्षण परिषदेत चर्चा घडवून आणली जाते. या संकल्पनेतून पंचायत समतिीच्या कृतीशील विस्तार अधिकारी सुनीता जाधव यांनी शिक्षकांना विश्वासात घेऊन दगडापासून शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्याचा संकल्प केला.महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या पार नदीच्या तिरावर शेपूझरी तीर्थस्थानी शिक्षकांची नैसर्गिक कार्यशाळा घेण्यात आली. नदीपात्रात असलेले गुळगुळीत झालेले गोटे जमा करण्यात आले. विविध आकाराचे दगड गोटे पाहून शिक्षकांचेही सुप्त गुण जागे झाले. लगेचच विविध पक्क्या रंगानी दगड रंगवण्यास सुरु वात झाली. आणी एका पेक्षा एक शैक्षणिक साहित्याचा कलाविष्कार निर्मित झाला. मुलांना आवडणार्या आकर्षक रंगामध्ये मुळाक्षरे, गणतिाचे चिन्ह, इंग्रजी व मराठी शब्द यापासून तर बेटी बचओ सारखे सामाजिक संदेशही या दगडांचा पृष्ठ भागावर दिसू लागले.
पाषाणातून उलगडला आगळावेगळा कलाविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 2:13 PM