सायखेडा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाळोटी माथा, भेंडाळी येथील मुलांची क्षेत्रभेट निफाड तहसील कार्यालयात आणि पंचायत समिती पहाणी दौरा केला. शासकीय कार्यालयात पहाणी करणारी तालुक्यातील पहिली शाळा ठरली आहे.दरम्यान या वेळी कार्यालय पहात असतांना तहसीलदार दीपक पाटील व विद्यार्थी यांच्यात संवाद सुरु होता, मुले अनेक प्रश्न पाटील यांना विचारत हाते. पाटील यांनी मुलांना तुम्हाला काय हवे आहे अशी विचारणा करताच त्यातील काही मुलांनी आम्हाला तानाजी सिनेमा पहायचा आहे, अशी इच्छा व्यक्त केली.पाटील क्षणाचाही विलंब न करता पाटील यांनी निफाड शहरातील रविराज सिनेमा गृहात स्वखर्चाने मुलांना सिनेमा दाखवायला घेऊन गेले. मुलांसोबत बराच वेळ घालवला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाळोटी माथा शाळेतील शिक्षक बाजीराव कमानकर व जयश्री पवार यांनी मुलांना शासकीय कार्यालये आणि तेथील कामकाज कसे असते हे दाखविण्यासाठी क्षेत्रभेट म्हणून निफाड तहसील कार्यालय आणि पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूसंपादन विभाग, वृत्तपत्र कार्यालय येथे अनोखी क्षेत्रभेट काढली.या उपक्र मासाठी शाळेला तहसीलदार दीपक पाटील, गटविकास अधिकारी संदिप कराड, गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, केंद्रप्रमुख ओंकार वाघ यांचे मार्गदर्शन मिळाले.तहसीलदार पाटील तहसीलदार होण्याअगोदर प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे एका शिक्षकातील विद्यार्थ्याप्रति असलेला भाव जागृत झाले व त्यांनी मुलांचे समाधान केले. े एक वरिष्ठ अधिकारी अशा प्रकारे सहानुभूतीपूर्वक मुलांचा विचार करत त्यांची इच्छा पूर्ण करतो असा आगळावेगळा अनुभव शिक्षक व उपस्थित कर्मचारी यांना आल्याने त्यांनी देखिल समाधान व्यक्त केले.हाळोटी माथा भेंडाळी या शाळेतिल शिक्षक सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्र म राबवित असतात, क्षेत्रभेट निसर्गरम्य ठिकाणी न नेता प्रशासकीय कामकाजाची माहिती मुलांना व्हावी अशा ठिकाणी आणली आणि मुलांना प्रत्यक्ष अनुभूती दिली मुलांनी खूप काही प्रश्न विचारून कामकाजाची माहिती करून घेतली.- केशव तुंगार, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, निफाड.
प्रशासकीय कार्यालयात मुलांची अनोखी सहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 6:19 PM
सायखेडा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाळोटी माथा, भेंडाळी येथील मुलांची क्षेत्रभेट निफाड तहसील कार्यालयात आणि पंचायत समिती पहाणी दौरा केला. शासकीय कार्यालयात पहाणी करणारी तालुक्यातील पहिली शाळा ठरली आहे.
ठळक मुद्देशासकीय कार्यालयात पहाणी दौरा करणारी तालुक्यात पहिली शाळा