कसबे सुकेणे : इंधन व स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने भाववाढ होत असल्याने, देशात महागाई वाढत आहे. त्यामुळे गृहिणी वैतागल्या असून केंद्र सरकारचा निषेध म्हणून निफाड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी केंद्र सरकारला कसबे सुकेणे येथून टपालाने पाकिटात गोवऱ्यांची राख भरून ती दिल्लीला पाठविली. या अनोख्या आंदोलनाची निफाड तालुक्यात दिवसभर चर्चा सुरू होती.
कसबे सुकेणे येथे शनिवारी (दि. ४) इंधन व स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरच्या दरवाढीचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सरचिटणीस अश्विनी मोगल यांच्या नेतृत्वाखाली कसबे सुकेणे येथे गॅस दरवाढीच्या निषेधार्थ पंतप्रधान मोदी यांना टपालाद्वारे शेणाच्या गोवऱ्या व त्याची राख पाठविण्यात आली.
कसबे सुकेणे येथील टपाल कार्यालयात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्याा महिलांनी गोवऱ्यांची राख भरलेली पाकिटे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाला भेट म्हणून पाठविली.
यावेळी आरती तिडके, शीतल वाघ, ज्योती वाघ, लक्ष्मीबाई तिडके, शबाना शेख, स्वाती पिंपळे, अलका पिंपळे, सुशीला गवळी, आदी महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
कोट...
ग्रामीण भागातील सर्वसामान्य, शेतकरी व शेतमजूर व गृहिणी स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर दरवाढीमुळे महागाईत होरपळत आहेत, याचा निषेध म्हणून आम्ही शेणाच्या गोवऱ्या मोदी सरकारला टपालाने पाठवीत आहोत.
- अश्विनी मोगल, सरचिटणीस, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस.
040921\img-20210904-wa0081.jpg
कसबे सुकेणे येथे महागाई च्या निषेध भ्हणुन मोदी सरकारला शेणाच्या गोव-या टपाल कार्यालयातुन पाठवितांना अश्विनी मोगल व महिला कार्यकर्त्यां