पेठ : तालुक्यातील बोंडारमाळ या छोटेशा दुर्गम पाड्यावर गेल्या ३० वर्षांपासून सत्यनारायण पूजनाने नवीन वर्षाच्या स्वागताची एक अनोखी व आदर्शवत परंपरा सुरू करण्यात आली असून, २०२१ या नववर्षाच स्वागत सत्यनारायण पूजनासोबत वृक्ष नारायणाची पूजा करून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १०१ वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याची शपथ घेतली.
गावच्या मध्यवर्ती सभागृहात सर्व ग्रामस्थांनी एकत्रित पूजा मांडून पाटावर वृक्ष ठेऊन जोडप्याने पूजन केले. ज्येष्ठ सामाजसेवक मुकुंद दीक्षित व वासंती दीक्षित यांनी वृक्ष नारायण कथेचे वाचन केले. उद्योजक दौलतराव कुशारे व नंदा कुशारे यांनी गावाला आंबा, काजू, चिकू, पेरू, जांभूळ अशी १०१ रोपे भेट दिली. वृक्ष नारायणाच्या पूजेनंतर गावातून वाजतगाजत वृक्षांची मिरवणूक काढण्यात आली. गावच्या सार्वजनिक, तसेच खासगी जागेत वृक्षारोपण करून त्याचे संगोपन व जतन करण्याची गावकऱ्यांनी शपथ घेतली. या अनोख्या उपक्रमात आपली आपुलकी संस्थेचे अध्यक्ष खंडेराव डावरे, रामदास शिंदे, कमोद गाडर, कैलास गाडर, काळू वातास, हिरामण गाडर, हिरामण वातास, मावंजी वातास, गंगाराम पेटार, सोमा वातास, जितु पेटार यांचेसह अबालवृद्ध सहभागी झाले होते.
---------------------------
सत्यनारायण पूजेसोबत पर्यावरण संरक्षण हा संदेश घेऊन वृक्ष नारायणाची पूजा करून बोंडारमाळवासीयांनी एक अनोखा आदर्श उभा केला आहे. अशा प्रकारे गावोगाव वृक्षपूजन, लागवड व त्याचे संगोपन केल्यास वनसंपत्तीचे नक्कीच जतन होईल.
- मुकुंद दीक्षित, समाजसेवक
-----------------------
तीन वर्षांपूर्वी दुष्काळग्रस्त बोंडारमाळ या पाडयावर पाण्याची व्यवस्था करून देण्यासोबत वृक्ष लागवड करण्याचे ठरविले. ग्रामस्थांनी नियोजन करून नवीन वर्षाच्या स्वागताबरोबर वृक्ष नारायण पूजन व रोपण करून एक आदर्शवत काम केले आहे.
-दौलतराव कुशारे, ऊद्योजक
----------
बोंडारमाळ ता.पेठ येथे वृक्ष नारायण पूजन करताना ग्रामस्थ. (०२ पेठ ४)
===Photopath===
020121\02nsk_3_02012021_13.jpg
===Caption===
०२ पेठ ४